शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पासवर्ड हॅकिंग प्रकरणात ‘त्या’ एजंटचा सहभाग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:16 IST

नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी मोटार परिवहन निरीक्षकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरून व्यावसायिक वाहने तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणाशी एका एजंटचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आरटीओ कार्यालयात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी एका एजंटने अशाच ...

ठळक मुद्देएका एजंटचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा कार्यालयीन कर्मचारी व एजंट यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ मैत्री

नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी मोटार परिवहन निरीक्षकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरून व्यावसायिक वाहने तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणाशी एका एजंटचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आरटीओ कार्यालयात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी एका एजंटने अशाच प्रकारे कार्यालयातील एका कर्मचाºयाचा पासवर्ड चोरून आरटीओत वाहनांची बनावट पावत्यांच्या आधारे नोंदणी करून शासनाचा जवळपास १८ लाख रुपयांचा कर बुडवून फसवणूक केल्याचाही प्रकार उघडकीस आला होता त्यामुळे आयडी आणि पासवर्ड चोरी प्रकरणाशी या एजंटचा सहभाग आहे का याची तपासणी करणेही गरजेचे ठरणार आहे.देशातील पहिलेच स्वयंचलित केंद्र म्हणून नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची ओळख आहे. कार्यालयातील बहुतांशी कामे ही आरटीओ अधिकारी व एजंट यांच्यातील संगनमताने एजंटच्या माध्यमातूनच केली जातात. कार्यालयीन कर्मचारी व एजंट यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ मैत्रीच्या संबंधामुळे कोणत्या संगणकावर कोणते काम चालते याची बहुतांश माहिती ही एजंटांनाही आहे त्यामुळे अधिकाºयांचे लॉगिन आयडी तसेच पासवर्डदेखील काही एजंटांना माहिती असल्याची उघडपणे चर्चा आहे.काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका एजंटने कार्यालयीन कर्मचाºयांच्या मदतीने ज्या संगणकावर वाहन नोंदणीचे काम चालते त्या संगणकावर काम करणाºया कर्मचाºयाच्या संगणकावर नोंदीत फेरफार करून महागड्या व आलिशान वाहनांचा कर भरल्याच्या बनावट पावत्यांच्या आधारे नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित एजंटने तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एजंटसह कार्यालयातील काही कर्मचाºयांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सर्व प्रकार एजंट व कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचाºयांच्या संगनमताने झाल्याची चर्चा होती त्यावेळी आरटीओने काही वाहनेदेखील जप्त केली होती.चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणाबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाशी त्यावेळच्या त्या एजंटचाही संबंध आहे का? याची चौकशी करणेही पोलिसांना गरजेचे ठरणार असले तरी सध्या आरटीओत एजंटगिरी करणाºयांत पूर्वीच्याच एजंटचा सहभाग असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.