शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आगासखिंडला बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

आगासखिंड येथील प्रगत ॲग्रोचे संचालक प्रताप विठोबा जाधव (२८) हे बुधवारी (दि.२१) रात्री दहा वाजेच्या सुमारास कडवा कालव्याच्या रस्त्याने ...

आगासखिंड येथील प्रगत ॲग्रोचे संचालक प्रताप विठोबा जाधव (२८) हे बुधवारी (दि.२१) रात्री दहा वाजेच्या सुमारास कडवा कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने आपल्या घराकडे जात असताना कालव्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकी चालवत असलेल्या प्रताप जाधव यांच्यावर झडप घातली. जाधव यांचा तोल जाऊन ते खाली पडले. बिबट्याच्या पायाच्या पंजाने जाधव यांच्या डाव्या हातावर गंभीर जखमा झाल्या. प्रताप जाधव यांनी आरडाओरड केल्याने चवताळलेल्या बिबट्याने अंधारात धूम ठोकली. जखमी जाधव यांना अशोक जाधव, तानाजी जाधव, ओमकार जाधव व वनविभागाचे सद‌्गीर यांनी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना घरी सोडले. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दरम्यान,बेलू-आगासखिंड परिसरात दुचाकींवर हल्ला करणाऱ्या व पिंजऱ्यात जेरबंद न होणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने दुसऱ्या पद्धतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आगासखिंडचे सरपंच शिवाजी आरोटे, माजी सरपंच दत्तू आरोटे, उपसरपंच लहानू बरकले, बेलूचे सरपंच प्रकाश तुपे, संजु तुपे, अंकुश तुपे आदींनी केली आहे.

इन्फो

पिंजऱ्याजवळच हल्ला

बेलू - आगासखिंड परिसरात बिबट्याचे दुचाकींवर सातत्याने हल्ले सुरूच आहे. गेल्या हप्त्यात बिबट्याने याच ठिकाणी दुचाकीवर झडप घालत ओमकार बरकले व अक्षय बरकले यांना गंभीर जखमी केले होते. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर वनविभागाने येथे पिंजरा लावलेला आहे. विशेष म्हणजे या पिंजऱ्यापासून हाकेच्या अंतरावरच बिबट्याने प्रताप जाधव यांच्या दुचाकीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होण्याची शक्यता धूसरच आहे.

फोटो - २३प्रताप जाधव

आगासखिंड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी युवक शेतकरी.

===Photopath===

230421\23nsk_8_23042021_13.jpg

===Caption===

फोटो - २३प्रताप जाधव आगासखिंड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी  युवक शेतकरी.