शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

...पुन्हा एक फेसबुक हॅक

By admin | Updated: July 13, 2017 22:47 IST

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल साइटवरील अकाउंट हॅक होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल साइटवरील अकाउंट हॅक होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. एका तरुणाच्या फेसबुकवरून त्याच्या ६५६ मित्रांना ‘मोबाइल क्रमांकावर त्वरित रिचार्ज कर, कारण मोठ्या अडचणीत सापडलो’, असा संदेश गेला आणि काहींना शंका आली. त्यामुळे अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले.गेल्या आठवड्यामध्ये राजस्थान येथून एका हॅकरला पोलिसांनी अटक केली होती. त्याने महिलांचे सुमारे तीसहून अधिक अकाउंट हॅक केल्याचे समोर आले होते. या घटनेने शहर पोलीस चक्रावले होते. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तज्ज्ञांच्या मदतीने तपासचक्रे फिरवून अखेर हॅकरच्या मुसक्या आवळल्या; मात्र शहरातील नेटिझन्सचे सोशल साईट्सवरील अकाउंटवर अद्यापही हॅकर्सची वक्रदृष्टी कायम असल्याचे एका घटनेवरून स्पष्ट होत आहे. मंगळवारी (दि.११) मंगेश बाळू काटे यांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या मैत्रीच्या यादीमधील जवळपास ६५६ मित्रांना ‘तातडीने रिचार्ज करा, मी अडचणीत आहे’, असा संदेश पाठविला गेला. काही मित्रांना शंका आल्यामुळे त्यांनी थेट मंगेशसोबत संपर्क साधून विचारले असता त्याने असा कुठल्याही प्रकारचा संदेश पाठविला नसल्याचा खुलासा केला. यावर मित्रांनी त्याला तुझ्या फेसबुक अकाउंटवरून सर्व मित्रांना असा लघुसंदेश गेल्याची कल्पना दिली. यावरून अकाउंट हॅकरने हॅक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मंगेश यांनी तत्काळ पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार क थन करत अज्ञात हॅकरविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फे सबुक मेसेंजरचा वापर करून मित्रांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.