शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेटेंनंतर दोघे मातब्बर ‘रडार’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:10 IST

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही मातब्बर नेते श्रीराम शेटे यांच्याप्रमाणेच अन्य ठिकाणी शिक्षण संस्थेत सभासद अथवा संचालक असल्याचे पुरावे विरोधकांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.दरम्यान, लवादाचा निर्णय मान्य करीत त्या विरोधात न्यायालयात न जाण्याचे जाहीर करणाºया श्रीराम शेटे यांनी लवादाचा निर्णय झाल्यानंतर २४ तास उलटत नाही तोच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात धाव घेतली आहे. त्यांच्या समर्थकांनी याला दुजोरा दिला आहे, तर दुसरीकडे श्रीराम शेटे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करणारे शिवसेनेचे सुरेश डोखळे यांनीही यापूर्वीच उच्च न्यायालयात श्रीराम शेटे यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केल्याने श्रीराम शेटेंसमोरील अडचणी वाढल्याची चर्चा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेची निवडणूक यानिमित्ताने न्यायालयात पोहोचली आहे. श्रीराम शेटे यांनी उमेदवारी अर्जासोबत आपण कुठल्याही अन्य शिक्षण संस्थेचे सभासद नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर दिलेले असताना ते कादवा साखर कारखान्याच्या रा. स. वाघ शिक्षण संस्थेचे पदसिद्ध संचालक असल्याची हरकत सुरेश डोखळे यांनी घेतली होती. त्यावर लवादाने श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला होता. त्यामुळे प्रगती पॅनलला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला होता. निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यास निवडणुकीनंतर त्यांना अपात्र ठरविण्यासाठी विरोधक खेळी करणार असल्याची चर्चा आहे.