शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीनंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:55 IST

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.

ठळक मुद्देकणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेल्याची भीती

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.योजना सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून सन २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजना तयार झाल्यानंतर सुमारे १४ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा समितीकडे हस्तांतरित करून दिली. गेल्या काही दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने तेथील यंत्रसामग्री व वाळू खराब झाली होती. तसेच अनेक वेळा अशुद्ध पाणीपुरवठासुद्धा होत होता. पाणीपुरवठा योजनेसाठी दर महिन्याला वीजबिल, कर्मचारी पगार, टी.सी.एल. पावडर, देखभाल दुरुस्ती यासाठी अंदाजे सव्वा लाख रु पये खर्च येतो. धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर टी.सी.एल. पावडरचे मिश्रण करतात व त्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. पाणीपुरवठा समितीने पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारे टी.सी.एल. पावडर व आलम यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. नियमित वॉश आउट करणे गरजेचे आहे. शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा केला पाहिजे. पाणीपुरवठा समितीने यासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने सर्व मशीनरी बसविण्यात आली आहे.- ए. के. घुगे, शाखा अभियंताजलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित होता. गत महिन्यात वीजबिल भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बसविण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची अद्याप चाचणी झालेली नाही. पाणी शुद्ध करणारे अनेक विद्युतपंप बंद आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्थित शुद्ध होत नाही. याबाबत शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्याकडे पंधरा दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. भोजापूर धरणावरील उद्भव विहीर व शुद्धीकरण केंद्र येथील सर्व वीजपंप सुरळीत करून समितीकडे द्यावे.- गोपाळ शेळकेसरपंच, नांदूरशिंगोटे