शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कालिदास’चे नूतनीकरण आचारसंहितेनंतर

By admin | Updated: February 3, 2017 00:47 IST

आयुक्त : नाशिकरोडच्या नाट्यगृहासाठी कलावंतांच्या सूचना

 नाशिक : महापालिकेच्या कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबद्दल ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरून प्रशासनाचे वाभाडे काढल्यानंतर कालिदासच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेला आता निवडणूक आचारसंहितेनंतर वेग येणार आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे दसक भागात उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाच्या आराखड्यासाठी कलावंतांकडून सूचना मागविण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेसंबंधीची छायाचित्रे काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरून शेअर केली होती. त्याला नंतर राजकीय वळण लागून मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दामले यांचा समाचार घेतला होता. दामले यांना नाशिकच्याच नाट्यगृहांची दुरवस्था दिसली काय, असा खोचक सवालही खोपकर यांनी केला होता. त्यानंतर दामले यांनी स्वत: खुलासा करत आपण केवळ वस्तुस्थिती समोर आणल्याचे म्हटले होते. कालिदास कलामंदिरच्या बाबतीत वाभाडे निघाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत गांभीर्याने दखल घेत कालिदासच्या नूतनीकरणाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार असून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबत कार्यवाहीस सुरुवात होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. प्रामुख्याने, पावसाळ्यात जून-जुलैपासून कालिदासच्या कामास सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नाट्यव्यावसायिकांना पर्यायी स्वरूपात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी गायकवाड सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा करण्यात येणार आहे.नाशिकरोड येथील दसक भागात ४८५ आसन क्षमतेचे नाट्यगृह साकारण्यात येणार असून, सुमारे १८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाची रचना नेमकी कशी असावी, याबाबत कलावंतांकडून सूचना मागविण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.