शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही भगूर रेल्वे उड्डाणपूल अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:33 IST

भगूर रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही अद्याप काम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक करीत असून, रेल्वेच्या तांत्रिक मंजुरीअभावी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

नाशिक : भगूर रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही अद्याप काम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक करीत असून, रेल्वेच्या तांत्रिक मंजुरीअभावी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांसह भगूर परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सोय होऊन विकासाला गती मिळावी म्हणून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या निधीतून भगूर रेल्वेगेट नं. ८५ वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २२ सप्टेंबर २०१५ रोजी उड्डाणपुलाच्या कामास तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली होती. या कामाचा ठेका धुळे येथील बाळासाहेब भदाणे यांना १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ रुपयांस देऊन ते २१ मार्च २०१७ पर्यंत म्हणजे १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे शासनाने निर्देश दिले होते, तरीही आज मितीला मुदत संपून १५ महिने झाले तरी पुलाचे बरेच काम बाकी आहे. यासंदर्भात कामगारांना विचारले असता, कामाच्या कालावधीची मुदत वाढवून मिळाली असल्याचे सांगण्यात आले. उड्डाणपुलासाठी लागणारे काही बांधकाम साहित्य पुणे येथे बनविण्यात आले असून, ते बसविण्यासाठी त्याची तांत्रिक मान्यता रेल्वे बोर्डाकडून घ्यावी लागते. अशा प्रकारचे साहित्य तयार असले तरी, रेल्वेकडून त्याच्या तपासणीसाठी विलंब लावला जात असल्यामुळेच पुलाचे काम पुढे सरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु रेल्वेच्या या वेळकाढूपणाचा फटका नागरिकांना बसत असून, दळणवळणाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग