शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

अविश्वास ठरावानंतर तुकाराम मुंढे बॅक फुटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:27 IST

नाशिक : करवाढीचा बोजा लादल्याने टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली आहे, तर नवीन वार्षिक भाडेमूल्य आकारताना जी दुप्पट तिप्पट वाढ केली होती ती सरासरी पन्नास टक्क्यांनी मागे घेतली आहे.

ठळक मुद्देकरवाढीत पन्नास टक्के घट : मोकळ्या भूखंडांवरील दर पूर्वीप्रमाणेच

 

 

नाशिक : करवाढीचा बोजा लादल्याने टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली आहे, तर नवीन वार्षिक भाडेमूल्य आकारताना जी दुप्पट तिप्पट वाढ केली होती ती सरासरी पन्नास टक्क्यांनी मागे घेतली आहे.गुरुवारी (दि. ३०) महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी आपल्या ३१ मार्च रोजीच्या अधिसूचनेत शुद्धीपत्रक काढण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही दरवाढ कमी केल्याचे नमूद केले. महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही ही दरवाढ मागे घेतल्याचे त्यांनी नमुद केले आहे.९ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणाºया तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च विशेष अधिसूचना काढून मिळकतींच्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली होती. त्यात मोकळ्या भूखंडाच्या कर आकारणीचे दर तीन पैशांवरून ४० पैसे असे केले होते त्यामुळे शेती बिनशेती आणि क्रीडांगणे मैदान यावर एकरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी आकारणी होणार होती. याशिवाय निवासी क्षेत्रात यापूर्वी मालकाला एक पट, तर भाडेकरूला दुप्पट कर आकारणी होती ती तिप्पट केली होती, मात्र तीदेखील मागे घेतली असून नव्या शैक्षणिक इमारतींना वाणिज्य दराने घरपट्टी लागू करण्यात आली होती. तीदेखील त्यांनी बदलून शाळा इमारतींना घरगुती दर लागू होतील असे जाहीर केले आहे.मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधात शहरात आंदोलने झाल्यानंतर सत्तारूढ भाजपाने विशेष महासभा बोलवून त्याच्या सरसकट करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्याची अंमलबजावणी मुंढे यांनी केली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना तोडगा काढण्यास सांगूनही उपयोग न झाल्याने अखेरीस मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून, येत्या शनिवारी (दि. १सप्टेंबर) विशेष महासभा घेण्यात येणार आहे.शिक्षण संस्थांना दिलासा...नवीन वार्षिक भाडेमूल्य घोषित करताना आयुक्तांनी शिक्षण संस्थांना अनिवासी म्हणजे वाणिज्य स्वरूपाची घरपट्टी लागू केली होती. अनिवासी घरपट्टी त्यातच मोकळ्या मैदानांनादेखील करवाढ असल्याने शिक्षण संस्थांची नाराजी होती, मात्र त्यात दुरुस्ती करण्यात आली असून, शिक्षण संस्थांना निवासी क्षेत्राच्या वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थांना दिलासा मिळणार आहे.सामान्य नागरिकांच्या दृष्टीने वाहनतळांच्या जागेवरील करवाढ ही अडचणीची मानली जात होती, मात्र त्यातदेखील ५० टक्के कपात करण्यात आली आहे.आता राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष सत्तारूढ भाजपासह सर्व पक्षियांनी मुंढे यांना करवाढीच्या मुद्द्यावरून लक्ष केले होते. आता मुंढे करवाढीबाबत बॅक फुटावर आल्यानंतर हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे.