शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

चार तासांनंतर गणरायांचे दर्शन दुर्लभ ! चोरांची भीती : सुरक्षिततेसाठी मौल्यवान मूर्ती कार्यकर्त्याच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 16:29 IST

श्याम बागुलनाशिक : श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व किमती गणरायांना चोरांच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणाहून दररोज सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात चक्क रात्रीच्या वेळी कार्यकर्त्याच्या घरात मुक्काम करावा ...

श्याम बागुलनाशिक : श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व किमती गणरायांना चोरांच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणाहून दररोज सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात चक्क रात्रीच्या वेळी कार्यकर्त्याच्या घरात मुक्काम करावा लागतो. कोणत्याच गणेशभक्तांना न आवडणारा हा निर्णय हिरावाडीतील नवजीवन कला-क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळातील कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून घ्यावा लागला आहे. त्यामागचे कारण म्हणजे पोलिसांनी मौल्यवान गणरायांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास सपशेल नकार दिला आहे.सालाबादाप्रमाणे यंदाही नाशकात गणेशोत्सवाची धूम असून, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांमध्ये ५६८ लहान व १९१ मोठे मंडळे सहभागी झाले आहेत. दरवर्षाप्रमाणे यावेळीही ३९ मौल्यवान व किमती गणरायांची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यात बºयाचशा मंडळांनी मौल्यवान गणरायांच्या दागिन्यांमध्ये मोठी भर घालून त्यांचे मोल आणखीच वाढविले आहे. रविवार कारंजा येथील चांदीचे घडविलेले सिद्धिविनायक वगळता उर्वरित मौल्यवान गणरायांचे फक्त गणेशोत्सवाच्या काळातच आगमन होते. गणेशभक्तांसाठी या मौल्यवान गणरायांचे जसे आकर्षण असते तितकीच मूर्तीची काळजी संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही घ्यावी लागते. दिवसा व रात्री त्यांना मंडळात जागता पहारा द्यावा लागतो, त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येते.शहरात उत्सवाच्या काळात पोलिसांचा जागता पहारा असतानाही चोºया,घरफोड्यांचे प्रमाण कायम असून, दिवसा व सायंकाळी घराबाहेर पडणाºया महिलांचे सौभाग्याचे लेणं सुखरूप राहिलेले नाही, अशा परिस्थितीत सार्वजनिक चौकात प्रतिष्ठापना केलेल्या मौल्यवान व किमती गणरायांची चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस खात्याची असताना त्यांनी मात्र ही जबाबदारी टाळण्याची सपशेल भूमिका घेत एक प्रकारे चोरांपुढे नांगी टाकल्याचे वर्तन केले आहे. मौल्यवान गणरायांची प्रतिष्ठापना करणाºया मंडळांनीच प्रामुख्याने किमती मूर्तींचे चोरांपासून संरक्षण करावे, अशा सूचना देत त्यांच्यावर सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यासाठी मौल्यवान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी पोलीस परवानगी घेण्यास जाणाºया मंडळांनाच धारेवर धरले जात असल्याने हिरावाडी येथील नवजीवन कला क्रीडा सांस्कृतिक सार्वजनिक मित्रमंडळाने त्यांच्या एक किलो चांदीच्या मूर्तीची गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केली. परंतु अशी प्रतिष्ठापना करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी धार्मिकता जोपासत ब्रह्मवृंदांशी सल्लामसलत करून दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंतच मूर्ती मंडपात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवता येईल अशा पद्धतीने धार्मिक पूजा अर्चा करून घेतली. चोरांच्या भीतीने रात्री ११ वाजता सार्वजनिक मंडपातून मूर्ती हलवून ती कार्यकर्त्यांच्या घरात ठेवली जाते व दुसºया दिवशी पुन्हा सायंकाळी ६ वाजता मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जात आहे.शहरातील सर्वच गणेश मंडळांना बंदोबस्त देण्यात आल्याचा दावा पोलीस यंत्रणेकडून केला जात असताना प्रत्यक्षात त्याचे वास्तव काही वेगळेच आहे. देव-देवताही नाशिक शहरात चोरांपासून सुरक्षित राहू शकत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते?