शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

...पण गुढी उभारा अमावास्या समाप्तीनंतर

By admin | Updated: March 25, 2017 00:33 IST

नाशिक : येत्या २८ मार्चला गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावास्या असल्याने गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, गुढी कधी उभारायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

नाशिक : येत्या २८ मार्चला गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावास्या असल्याने गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, गुढी कधी उभारायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी २८ मार्चलाच गुढीपाडवा साजरा करण्याचा खुलासा केला असून, गुढी मात्र सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनंतर अमावास्या समाप्तीनंतर उभारण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. यंदा दि. २७ मार्च रोजी दर्श सोमवती अमावास्येस सकाळी १०.४४ वाजता प्रारंभ होऊन दि. २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ वाजता अमावास्या समाप्ती होते. सर्वसाधारणपणे हिंदू पंचागानुसार सूर्याने पाहिलेली तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. मात्र, दाते पंचांगकर्त्यांनी याबाबत स्पष्ट खुलासा करत दि. २८ मार्चलाच गुढीपाडवा साजरा करावा, असे म्हटले आहे. दाते पंचागानुसार, शके १९३९ या नूतन संवत्सराच्या पहिल्या दिवशी २८ मार्च रोजी मंगळवारी सूर्योदयानंतर सकाळी ८.२७ पर्यंत अमावास्या असून, प्रतिपदा क्षयतिथी आहे. प्रतिपदेची समाप्ती बुधवारच्या सूर्योदयापूर्वी पहाटे ५.४५ वाजता आहे. प्रतिपदेचा क्षय असल्याने मंगळवारी सकाळी ८.२७ नंतर म्हणजेच अमावास्या समाप्तीनंतर नूतन संवत्सरारंभ होईल. त्यामुळे दि. २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ नंतर नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीपूजन व श्री गणपतीपूजन करावे. मात्र, सकाळी ८.२७ पूर्वी स्नान करून संध्या व देवपूजा करता येईल, असेही पंचागात स्पष्ट करण्यात आले आहे. सूर्यसिद्धांतीय गणित पद्धतीनुसार २८ मार्च रोजी प्रतिपदा तिथीचा क्षय होत नसल्याने उत्तरेकडील काशी आदि प्रदेशातील पंचांगात २९ मार्च रोजी गुढीपाडवा दिलेला आहे.  गणित पद्धतीतील भिन्नतेमुळे भारतामध्ये नूतन संवत्सराचे दोन दिवस असणार आहेत. मराठी माणसाचे पंचांग हे दृक्प्रत्ययी गणित पद्धतीचे असल्याने २८ मार्च रोजीच गुढीपाडवा साजरा करण्यात यावा. महाराष्ट्र, गुजरातसह भारतातील सर्व दृक्प्रत्ययी पंचांगांमध्ये व भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगातदेखील गुढीपाडवा २८ मार्च रोजीच आहे.