शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतरच वाजणार फटाके

By admin | Updated: October 11, 2014 21:47 IST

निवडणुकीनंतरच वाजणार फटाके

 

नाशिक : शहराच्या विविध भागात अधिकृतरीत्या फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी महापालिकेने मतदानानंतरचा मुहूर्त निवडला आहे. १६ तारखेपासून दुकानांच्या जागांचे लिलाव होणार आहेत. त्यानंतर १८ ते २५ असा केवळ आठ दिवसांचा कालावधीच व्यवसायासाठी मिळणार असून, त्यामुळे उलाढाल काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या वतीने विविध विभागांत फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केल्या जातात आणि लिलाव पद्धतीने व्यावसायिकांना दिल्या जातात. यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यास विलंब झाला. ही परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेने सहाही विभागांत एकूण ३२ जागांवर १७९ गाळ्यांचे लिलाव घेण्याचे निश्चित केले आहे. यात पूर्व विभागात ६, पश्चिम विभागात २, पंचवटी विभागात १०, नाशिकरोडला ३, सातपूरला ६ आणि सिडकोत ५ अशा ३१ ठिकाणी गाळ्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पूर्व, पश्चिम आणि पंचवटी या तीन विभागांत मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६, तर उर्वरित तीन विभागांमधील जागांसाठी १७ आॅक्टोबर रोजी लिलाव होणार आहेत. त्यानंतर १८ ते २५ या कालावधीसाठीच फटाक्यांचे गाळे थाटण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना जेमतेम ७ ते ८ दिवस परवानगी मिळणार आहे. साधारणत: गणपतीमूर्ती विक्री करणाऱ्यांप्रमाणेच फटाके व्यावसायिकांना दहा ते पंधरा दिवस आवश्यक आहेत, परंतु तेवढा कालवधी यंदा मिळणार नसल्याने उलाढाल मंदावण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)