शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर देशात सत्तांतर अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:27 IST

सर्वच पातळींवर मोदी सरकार अपयशी ठरल्यामुळे देशात ‘संविधान बचाव, मोदी हटाव’ची चळवळ सुरू झाली आहे.

नाशिक : सर्वच पातळींवर मोदी सरकार अपयशी ठरल्यामुळे देशात ‘संविधान बचाव, मोदी हटाव’ची चळवळ सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे देशातील जनतेचा सध्याचा मूड पाहता आगामी निवडणुकीत देशात सत्तांतर अटळ असल्याचा दावा करून महाराष्टचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातही धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येण्याची तयारी सुरू झाली असल्यामुळे कॉँग्रेस प्रसंगी दोन पावले मागे टाकण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.  दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या निवडणुकीत महाराष्टत दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढली असती तर राज्यात वेगळे चित्र दिसले असते असे सांगून वेगळे लढूनही राज्यात दोन्ही कॉँगे्रसला ३५.२ टक्के मते मिळाली होती, भाजपापेक्षा ही मते अधिक होती. त्यामुळे आगामी निवडणूक दोन्ही कॉँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येऊनच लढतील. ज्या ठिकाणी कॉँग्रेसची तयारी नाही अशा ठिकाणी जागा वाटपाबाबत तडजोड केली जाईल, असे चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आघाडी सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते व त्याचा लाभही दोन्ही समाजाला मिळाला होता.मागासवर्गीय आयोगाचे कामकाज न्यायिक प्रक्रिया असून, त्यांनी दिलेला निर्णय दोन्ही बाजूंनी होऊ शकतो.  यदाकदाचित मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिला तर सरकार काय करणार? त्यासाठी बी प्लॅन तयार आहे काय अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी आमदार सुधीर तांबे, माजीमंत्री शोभा बच्छाव, शरद अहेर, हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, संपत सकाळे, उद्धव पवार, राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.आघाडी सरकारच्या अध्यादेशाला विरोध का?सप्टेंबर २०१४ मध्ये राज्यातील आघाडी सरकार बरखास्त झाले व त्यानंतर निवडणुका होऊन भाजपाची सत्ता आली. त्यामुळे सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत मराठा आरक्षणाबद्दल न्यायालयात बाजू मांडण्याची जबाबदारी भाजपाची व पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला असे सांगून चव्हाण म्हणाले की, आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश काढला होता, तोच आता फडणवीस सरकारने काढल्यामुळे त्यावेळी त्या अध्यादेशाला का विरोध करण्यात आला, असा सवाल चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण