शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चव्हाण कन्येसह शिवसेनेत

By admin | Updated: February 3, 2017 01:27 IST

काही शिवसैनिक नाराज : शिवसेना कार्यालयात स्वीकारला ‘भगवा’

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष व अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी गुरुवारी (दि.२) संध्याकाळी शिवसेनेमध्ये आपल्या कन्येसह प्रवेश केला. चव्हाण हे प्रभाग तीसमधून तर त्यांची कन्या प्रभाग तेरामधून इच्छुक आहे. यामुळे अन्य काही शिवसैनिक ांमध्ये नाराजी आहे.आमदार अजय चौधरी हे काही दिवसांपूर्वी शहरात आले असता त्यांच्याकडे चव्हाण यांच्या प्रवेशाबाबत नाराजी बोलून दाखविली होती. यावेळी शिवसेना कार्यालयात गोंधळ निर्माण होऊन तिकीट कापाकापीचे नवे वादळ उठले होते. शहराची धुरा ज्यांच्याकडे आहे त्यांनी नाराज गटाची समजूतही काढण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता. अखेर चव्हाण यांनी काही मोठ्या नेत्यांचा हात धरून शिवसेनेचा उंबरा चढला. त्यामुळे आता प्रभाग तीस व तेरामधील काही शिवसेनेच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या गटामधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. पक्षप्रवेश होण्याअगोदरच चव्हाण यांनी दोन्ही प्रभागात प्रचारालाही सुरुवात केली होती. गुरुवारी शिवसेना कार्यालयात खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते आदि उपस्थित होते.चव्हाण यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिवसेनेच्या इच्छुक कार्यकर्त्यांकडून बंडखोरी करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कारण प्रभाग तीसमध्ये जवळपास चारही जागांवर शिवसेनेकडून उमेदवारीचा दावा काही इच्छुक शिवसैनिक करत आहे. चव्हाण यांचा प्रवेश झाल्याने त्यांचा ‘पत्ता कट’ होण्याची चिन्हे आहे. यामुळे संबंधितांकडून बंडखोरी होऊ शकते. चव्हाण यांना प्रभाग तीस मधून तिकीट मिळाल्यास ‘त्या’ नाराज पॅनलमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.