शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या बडग्यानंतर बीएलओ लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:57 IST

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने ...

ठळक मुद्देगती कमीच : १६ हजार मतदारांपर्यंत पोहचले कर्मचारी

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने निवडणूक शाखेने कारवाईचा इशारा देताच कामाला काही प्रमाणात गती प्राप्त झाली आहे. मात्र कळवण आणि निफाड तालुक्यामधील बीएलओंकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने जिल्ह्यातील पहिली कारवाई यापैकी एका तालुक्यातून होऊ शकते, अशी शक्यता निवडणूक यंत्रणेकडून वर्तविली जात आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत सुमारे ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बीएलओ गांभीर्याने काम करीत नसल्याने केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी करण्यात आल्याचे समोर आले होते. निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य होणार नसल्याने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. जे कर्मचारी गांभीर्याने कर्तव्य बजवणार नाहीत अशा बीएलओंवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिल्याने आता बीएलओ कामाला लागले आहेत. गुरुवार (दि.१६) पर्यंत १६ लाख ४ हजार २८८ मतदारांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे काम बीएलओंना करायचे आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत मतदारांपर्यंत पोहचून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक शाखेने अ‍ॅप निर्माण केलेले असून, मोबाइच्या साह्याने आॅनलाइन माहिती भरण्याचे काम करता येणार आहे. यामुळे कामाला गती येणे अपेक्षित होते. त्यानुसार काही प्रमाणात कामाला गती आली असली तरी अजूनही मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. अजूनही जवळपास ३० लाख मतदारांपर्यंत बीएलओंना पोहचावे लागणार आहे.बीएलओंवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक शाखेने दिल्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागल्याने पडताळणीचा आकडा वाढला आहे. ज्या तालुक्यांमध्ये कामकाज कमी होते तेथेदेखील वाढ झालेली आहे. मात्र कळवण आणि निफाड तालुक्यांमध्ये अजूनही कामकाज समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे.आठ मतदारसंघ रेड झोनमध्येजिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत सुरू असलेल्या मतदार पडताळणी अभियानात आठ तालुक्यांमध्ये अजूनही अपेक्षित कामगिरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे हे आठ मतदारसंघ अजूनही रेड झोनमध्येच आहेत. देवळाली मतदारसंघात ३२.३७, मालेगाव बाह्य मतदारसंघात २८.४९, नांदगाव २५.९९, सिन्नर २४.४४, मालेगाव मध्य २२.१८, नाशिक पूर्व २२.०२, येवला २१.१७, तर कळवण २०.९९ टक्के इतकेच कामकाज झाले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक