शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३५ वर्षांनी भरला बारावीचा वर्ग

By admin | Updated: September 2, 2016 22:30 IST

तब्बल ३५ वर्षांनी भरला बारावीचा वर्ग

 नामपूर : महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत सटाणा महाविद्यालयातील १९८० च्या बॅचच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नाशिक येथील पी. जी. फॉर्म येथे घेण्यात आला. या मेळाव्यात याच बॅचचे प्राध्यापक व प्राचार्यांनी या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरविला.या प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी कोण किती खोडकर होते याच्या आठवणी सांगण्यात आल्या. जमलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्मृतींना बहरत ठेवण्यासाठी फॉर्मच्या परिसरात वृक्षारोपण केले. दीपक नेरकर, कल्पना सोनवणे, डॉ. कीर्ती भामरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. तत्कालीन प्राचार्य ब्राह्मणकार, ई. डी. येवला, बी. एम. देवरे, वाय. डी. बेडसे, डी. आर. महाजन यांनी मेळाव्याचा उद्देश कथन करून आपल्या आशीर्वाद मनोगतातून यशस्वी जीवनाचे गमक उलगडले. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यक्तिगत मैत्री घट्ट करण्याबरोबरच एकमेकांच्या अडचणीच्या काळात धावून जाण्याचा संकल्प करण्यात आला. सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रवीण अमृतकर यांनी केले. दीपक नेरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)