शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीप्रश्नी महापालिका महासभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:09 IST

पश्चिम सभापतींचा आरोप : न्यायालयात दाद मागणार

ठळक मुद्देमहासभेतील प्रस्तावावर महापौरांनी दिलेला निर्णय आणि प्रत्यक्ष कामकाजात असलली भिन्नता यावर बोट ठेवत महापालिकेच्या पारदर्शी कारभाराबद्दल प्रश्न उपस्थितमहापौरांनी नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी फिटींग्जचे जे काही प्रस्ताव दिले असतील अथवा ते मंजुरीच्या प्रतीक्षेत असतील, असे सर्व प्रस्ताव ग्राह्य धरून आयुक्तांच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती

नाशिक - एलईडी फिटींग्जबाबत महासभेत महापौरांनी नगरसेवक निधीतील सर्व प्रस्ताव मंजूर करण्याचा ठराव केला असतानाही प्रशासनाकडून महासभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात असून याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी एका पत्रकान्वये म्हटले आहे.डॉ. पाटील यांनी महासभेतील प्रस्तावावर महापौरांनी दिलेला निर्णय आणि प्रत्यक्ष कामकाजात असलली भिन्नता यावर बोट ठेवत महापालिकेच्या पारदर्शी कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. पाटील यांनी म्हटले आहे, १० जानेवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत स्मार्ट लाईटिंगचा आयुक्तांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. महापौरांनी नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी फिटींग्जचे जे काही प्रस्ताव दिले असतील अथवा ते मंजुरीच्या प्रतीक्षेत असतील, असे सर्व प्रस्ताव ग्राह्य धरून आयुक्तांच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती. या कामकाजाचे रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे. स्वत: आयुक्तही या बैठकीला उपस्थित होते. परंतु, महिनाभरातच प्रशासनाने घूमजाव करत सदस्यांनी एलईडीसंबंधीचे दिलेले प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एलईडी फिटींग्ज न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. शहरात २२ हजाराहून अधिक एलईडी फिटींग्जची मागणी आहे. त्यासाठीच नगरसेवकांनी प्रस्ताव दिले होते परंतु, प्रशासनाने महापौरांच्या ठरावालाच वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. महापालिकेचे कामकाज नियमानुसार चालत नसेल तर न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचेही डॉ. हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले आहे.अडचणीत भर पडण्याची शक्यतासध्या नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी फिटींग्ज बसविण्यासाठी १२ कोटी ८७ लाख ८ हजार रुपये खर्चाची ११५ कामे दिलेली आहेत. ज्या कामांच्या निविदा निघाल्या आणि ज्या कंपन्यांनी कामे घेतली आहेत, त्या कंपन्यादेखील न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, कोर्टबाजीमुळे पुन्हा एकदा अडचणीत भर पडण्याची भीतीही डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका