निफाड/लासलगाव : वकिलांनी वकिली व्यवसाय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण केला पाहिजे. पक्षकार तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने येत असतो. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली वकिली पणाला लावावी. व्यवसाय करताना इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुमची प्रगती खुंटेल, असे प्रतिपादन अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी निफाड येथे केले. निफाड येथील कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयात बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा आणि निफाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती भोसले यांचा सत्कार सोहळा आणि उत्तर महाराष्ट्र वकील परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर अरुंधती भोसले, नाशिकचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरु ण ढवळे, भारताचे अॅडिश्नल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनयराज तळेकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, आशिष देशमुख, निफाड वकील संघाचे अध्यक्ष जी. एन. शिंदे, समन्वयक अॅड. इंद्रभान रायते, ए. के. भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्र माचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीत झाले. निफाड वकील संघाचे अध्यक्ष जी.एन. शिंदे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून निफाड वकील संघाची परंपरा व कार्यक्षेत्राची माहिती दिली. अॅड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविक केले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाजातील इमारतींचा प्रश्न व त्यावरील उपाययोजना याबाबत विचार मांडताना नाशिकच्या न्यायालयाच्या जागेचा प्रश्न मांडला. भारताचे अॅडिश्नल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.निफाड वकील संघाच्या वतीने अॅड. जी. एन. शिंदे यांनी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. न्या. भोसले यांच्या जीवनपटावरील चित्रफीत दाखविण्यात आली.यावेळी निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.जे. मंत्री,न्या. ए.जी. मोहबे, न्या. आर. एस. घाटपांडे, न्या. सातव, न्या. हस्तेकर, न्या. राठौर, न्या. धानोरकर, न्या. गवई, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश वाय.डी. शिंदे आदिंसह निफाड, नाशिक, कळवण, येवला,पिंपळगाव, मालेगाव, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, धुळे, पाचोरा, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव आदि भागातील वकील, न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील व्ही. एन. हाडपे, नामदेवराव ठाकरे, निफाड वकील संघाचे उपाध्यक्ष बी. के. जंगम, सेके्रटरी संजय दरेकर, खजिनदार अरविंद बडवर, सदस्य अविनाश उगलमुगले, संदीप पवार, शरद वाघ, रामनाथ शिंदे, शरद नवले, विजय मोगल, किरण आहेर, उत्तम चिखले, वैभव पानगव्हाणे, नारायण रोकडे, शशीभूषण अहिरराव, श्रीकांत रायते, श्रीकांत वल्टे, उत्तम कदम, उत्तम चिखले आदिंसह जिल्ह्यातील नामवंत वकील उपस्थित होते. इंद्रभान रायते यांनी आभार मानले. (वार्ताहर)
वकिलांनी पीडितांना न्याय मिळवून द्यावा
By admin | Updated: October 13, 2016 01:20 IST