वरखेडा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिंडोरी तालुका कृषी विभाग अंतर्गत उन्नत शेती समृद्ध शेती पंधरवाडा कार्यक्र म तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांच्या मार्गर्शनाखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.लोखंडेवाडी येथे आयोजित बैठकीत कृषी सहाय्यक बी. एच. काळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, बियाणे व निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, सेंद्रीय शेती भाजीपाला व फळबाग लागवड आधुनिक तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना फळ पिकावरील हुमणी नियंत्रण कार्यक्र म, बीज प्रक्रि या, कीडनाशक हाताळणी व फवारणीबाबत जनजागृती, शेतीशाळा जमीन आरोग्य पत्रिका इत्यादीबाबत यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये दुष्काळ असल्याने शेतकरी वर्गाने फळबाग वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.या बैठकी प्रसंगी लोखंडे वाडीचे सरपंच संदीप ऊगले, उपसरपंच सुभाष अरगडे, सहकारी सोसायटीचे संचालक बाळासाहेब दिवटे, माजी सरपंच शांताराम वाघ, शेतकरी रामदास मेधने, चेतन उगले, विठ्ठल वर्पे, योगेश उगले, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उन्नत शेती समृद्ध शेती पंधरवाडा शेतकऱ्यांना बैठकाद्वारे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:02 IST
वरखेडा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिंडोरी तालुका कृषी विभाग अंतर्गत उन्नत शेती समृद्ध शेती पंधरवाडा कार्यक्र म तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांच्या मार्गर्शनाखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उन्नत शेती समृद्ध शेती पंधरवाडा शेतकऱ्यांना बैठकाद्वारे मार्गदर्शन
ठळक मुद्दे फळबाग वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.