शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नामको प्रशासकाचा कारभार संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:30 IST

रिझर्व्ह बॅँकेने नाशिकमधील सर्वात जुन्या नामको बॅँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकाने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत बॅँकेचा व्यवहार संशयास्पद केल्यामुळेच बॅँकेचा एनपीए २८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

नाशिक : रिझर्व्ह बॅँकेने नाशिकमधील सर्वात जुन्या नामको बॅँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकाने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत बॅँकेचा व्यवहार संशयास्पद केल्यामुळेच बॅँकेचा एनपीए २८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. कर्जवाटप तसेच टेंडर प्रक्रियेतील अनियमितता यामुळेदेखील बॅँक आर्थिक संकटात असल्याने या प्रकरणी सनदी लेखापालांची समिती नियुक्त करून प्रशासकाच्या कारभाराची चौकशी करण्याचा ठराव येत्या सर्वसाधारण सभेत केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नामको बॅँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करण्यात आली. ६ जानेवारी २०१४ मध्ये रिझर्व्ह बॅँकेने जे. बी. भोरिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची नियुक्ती का करण्यात आली? प्रशासक नियुक्तीमुळे बॅँकेचे कोणते हित साधले गेले? आणि तत्कालीन संचालक मंडळावर कोणते आरोप होते? बॅँकेचे चार लेखापरीक्षण झाले त्यामध्ये एकही आरोप माजी संचालकांवर ठेवण्यात आलेला नाही याचे उत्तर आजही मिळाले नसल्याचा आरोप हेमंत धात्रक यांनी यावेळी केला.  २०१४ पर्यंत अत्यंत सुस्थितीत असलेली बॅँक डबघाईस आली असून, २०१४ मधील ग्रॉन एनपीए २७ कोटी म्हणजे केवळ ३ टक्के असताना आता मात्र ग्रॉस एनपीए २४१ कोटी म्हणजे २८ टक्के झाल्याचे पत्रकार परिषदेप्रसंगी सांगण्यात आले.  यावेळी हेमंत धात्रक आणि वसंत गिते यांनी बॅँकेवरील अनिर्बंध कारभाराबाबत चिंता व्यक्त करतानाच प्रशासकीय कारभारावर टीका केली. संचालक मंडळ अस्तित्वात असताना ५५ वर्ष सतत बॅँकेने सभासदांना लाभांश दिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून लाभांश देण्यात आलेला नाही. प्रशासकीय कारकिर्दीत झालेली खरेदीदेखील संशयास्पद असून, कोट्यवधींच्या सॉफ्टवेअर खरेदीसाठी कोणतीही निविदा काढण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला. प्रशासकांनी गेल्या १४ एप्रिल रोजी बॅँकेचा नफा ३५ कोटी २१ लाख असा जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र नफा केवळ २५.९५ कोटी इतकाच झाल्याचादेखील आरोप यावेळी करण्यात आला.  सुरत व दादर येथील शाखांचा एनपीए १०० टक्के झालेला आहे. दि. २८ मार्च रोजी १० कोटींची गुंतवणूक उत्कर्ष स्मॉल फायनान्स या बॅँकेत केलेली आहे. ती कधीही वसूल होणारी गुंतवणूक नाही. या कारभारामुळे बॅँक अडचणीत असून, या सर्व कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी हेमंत धात्रक, वसंत गिते, विजय साने, सोहनलाल भंडारी, नरेंद्र पवार, अविनाश गोठी, कांतीलाल जैन, भानुदास चौधरी, प्रशांत आव्हाड, प्रफुल्ल संचेती, सुभाष नहार, प्रकाश दायमा, अरुण मुनोत, भगवान खैरनार, शिवदास डागा, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, शिवनाथ कडभाने उपस्थित होते.माजी संचालकांकडून टीकानामको बॅँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करण्यात आली. २०१४ पर्यंत अत्यंत सुस्थितीत असलेली बॅँक डबघाईस आली असून, २०१४ मधील ग्रॉन एनपीए २७ कोटी म्हणजे केवळ ३ टक्के असताना आता मात्र ग्रॉस एनपीए २४१ कोटी म्हणजे २८ टक्के झाल्याचे सांगण्यात आले.  ४संचालक मंडळ अस्तित्वात असताना ५५ वर्ष सतत बॅँकेने सभासदांना लाभांश दिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून लाभांश देण्यात आलेला नाही.

टॅग्स :bankबँक