शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीवर प्रशासकाची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:47 IST

येथील औद्योगिक सहकारी वसाहतीत १३ संचालकांच्या अंतर्गत बेबनावामुळे काही संचालकांनी सहायक निबंधक सहकारी संस्था येवला यांच्याकडे दाखल केलेल्या तक्र ारीची चौकशी होऊन या संस्थेवर नवीन व्यवस्थापक समिती पदग्रहण करेपर्यंत संस्थेच्या कामकाजासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश येवला सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

येवला : येथील औद्योगिक सहकारी वसाहतीत १३ संचालकांच्या अंतर्गत बेबनावामुळे काही संचालकांनी सहायक निबंधक सहकारी संस्था येवला यांच्याकडे दाखल केलेल्या  तक्र ारीची चौकशी होऊन या संस्थेवर नवीन व्यवस्थापक समिती पदग्रहण करेपर्यंत संस्थेच्या कामकाजासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश येवला सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  येवला औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. अंगणगाव या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अल्पमतात आल्याने त्यांचे कामकाज थांबविण्यात यावे, अशा आशयाची तक्र ार ९ संचालकांनी येवला सहायक निबंधक व सहनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दाखल केली होती. येवला सहायक निबंधकांनी या प्रकरणी चौकशी अहवाल मागविला होता. या चौकशी अहवालात संस्थेच्या संचालक मंडळाच्या वेळोवेळी होणाºया सभांचा कोरम पूर्ण झालेला नाही. कोरमअभावी संस्थेचे कामकाज ठप्प झाले होते, संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात काही संचालक गैरहजर असल्याचे आढळून आले होते. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या संचालकांना संस्थेविषयी व सभासदांविषयी आस्था नसल्याचे निदर्शनास येत असून, सहकार नियमाप्रमाणे संस्थेवर प्राधिकृत अधिकारी नेमणे अपरीहार्य असल्याचे म्हटले आहे. येवला औद्योगिक सहकारी वसाहतीवर नवीन संचालक मंडळ येईपर्यत संस्थेवर प्रशासक म्हणून सहकार अधिकारी डी.व्ही. पाटील यांची नेमणूक करण्यात आल्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था येवला यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. याबाबत संस्थेच्या १३ संचालकांसह संबधितांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.