शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

दिंडोरीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:51 IST

Maharashtra Assembly Election 2019 दिंडोरी : दिंडोरी-पेठ विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) निवडणूक होत असून, सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, एकूण ३२२ केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले यांनी दिली.

दिंडोरी : दिंडोरी-पेठ विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) निवडणूक होत असून, सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, एकूण ३२२ केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले यांनी दिली. दिंडोरी-पेठ विधानसभा अंतर्गत एकूण ३२२ मतदान केंदे्र असून, एकूण तीन लाख तेवीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३२२ मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी असे एकूण राखीवसह १८२९ कर्मचारी कार्यरत असतील. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस शिपाई असेल. एकूण ९ पोलीस अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. तर ३२२ केंद्रांवर ३९ झोनल अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे.-------------------सखी मतदान केंद्र आकर्षणदिंडोरी येथील क्र ां. व्ही. एन. नाईक महाविद्यालय या केंद्र क्र मांक २०७ या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष ते शिपाई, पोलीस कर्मचारी या सर्व महिला असून, स्पेशल सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, प्रथमच महिला केंद्राध्यक्ष म्हणून मीरा खोसे, संध्या साखरे, स्वाती केकाण, नीलिमा बोराडे, रीता दंडगव्हाळ आदींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्राचे विशेष आकर्षण मतदारांना असणार आहे. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील मतदान केंद्रावर सजावट करून एक आयडियल आदर्श मतदान म्हणून असणार आहे. या केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच एकूण ३२२ मतदान केंद्रांपैकी ३४ मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीने लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे. निवडणूक प्रक्रि या सुरळीत पार पाडण्यासाठी प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, पेठचे तहसीलदार संदीप भोसले, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे आदी प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :dindori-acदिंडोरी