शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारत रखडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:17 IST

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली असतानाही निव्वळ बांधकाम व वित्त विभागाच्या असमन्वयामुळे इमारत बांधकाची निविदा रखडली असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असताना त्यांच्या कारकिर्दीत नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ होईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : खात्यांचा असमन्वय; मंत्रिमंडळ स्थिरस्थावर होईपर्यंत प्रतीक्षा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली असतानाही निव्वळ बांधकाम व वित्त विभागाच्या असमन्वयामुळे इमारत बांधकाची निविदा रखडली असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असताना त्यांच्या कारकिर्दीत नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ होईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे जागेअभावी विस्तारीकरण करणे अशक्य असल्यामुळे आहे त्या जागेतच अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागत आहे. ते टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या त्र्यंबकरोडवरील मालकीच्या जागेत नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारत बांधणीला मंजुरीही मिळविली. सुमारे ५५ कोटी रुपये खर्चाच्या या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार असून, एकूण खर्चाच्या २५ टक्के खर्च जिल्हा परिषदेने करावयाच्या अटीवर शासनाने या इमारत बांधकामाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार इमारत बांधण्याचे ठरविण्यात येऊन इमारतीचा नकाशा, अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासकीय इमारत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून विद्यमान पदाधिकारी व सदस्यांच्या कारकिर्दीत इमारत उभी राहावी व पदाधिकाºयांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी त्यांच्या हस्ते या इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात यावे, अशी मागणी केली.या बैठकीतच इमारत बांधकामाचा आढावा घेण्यात आला. त्यात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी इमारत बांधकामासाठी राज्य सरकारच्या दहा टक्के निधीची प्रतीक्षा असल्यामुळे कामाची निविदा काढण्यात येत नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर वित्त विभागाने निधीची तरतूद केल्यास इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा परिषदेच्या सेसमधून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असल्यामुळे काम करण्यास काय हरकत आहे, असा सवाल करण्यात आला. त्यात एक कोटी रुपये नवीन इमारतीच्या बांधकामासाठी व एक कोटी रुपये इमारत बांधकामाच्या जागेवर असलेले अडथळे दूर करण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र शासनाकडून टोकन रक्कम मिळत नाही तोपर्यंत निविदा काढता येत नसल्यावर बांधकाम खाते ठाम आहे. त्यावर वित्त विभागाने आपल्याकडून सदरची फाइल पूर्ततेसाठी यापूर्वीच पाठविण्यात आलेली असली तरी, काही तांत्रिक बाबींची अजूनही बांधकाम विभागाने पूर्तता केलेली नसल्याचे सांगितले. स्थायी समितीच्या सभेतच दोन विभागातील असमन्वयाचा अभाव दिसून आला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर एस. यांनी, इमारतीच्या बांधकामासाठी आढावा घेतला जात असल्याचे सांगितले.नवीन मंत्रिमंडळाची प्रतीक्षाराज्य सरकारकडून इमारत बांधकामासाठी दहा टक्के रक्कम मिळाल्यास निविदा काढण्याचा मार्ग मोकळा होणार असला तरी सध्या राज्यात नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर ग्रामविकासमंत्री, वित्तमंत्र्यांकडे जाऊन निधीसाठी पाठपुरावा करावा लागणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सभेत सांगण्यात आले. तूर्त जिल्हा परिषदेने कितीही घाई केली तरी, मंत्रिमंडळ स्थिर स्थावर होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.तांत्रिक बाबींची पूर्तताया इमारतीसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आदी जवळपास आठ बाबींची पूर्तता करण्याचे काम प्रशासनाच्या विविध खात्यांकडे सुपूर्द करण्यात आले असले तरी, या साºया कामांसाठी वर्षाचा कालावधी उलटूनही इमारतीच्या बांधकामाची निविदा निघू शकली नाही.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार