शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून ठरावावर दुसऱ्यांदा ‘टाच’?

By admin | Updated: June 21, 2017 00:31 IST

जलयुक्तच्या १० टक्के राखीव निधीचा वाद : ठराव शासनविरोधी असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पदाची सूत्रे घेतल्यापासून आपल्या धडाकेबाज निर्णयांमुळे चर्चेत असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी १० टक्के निधी राखीव ठेवू नये, या दुसऱ्या ठरावाला विखंडित करण्याची प्रशासनाने तयारी केल्याने ते यावेळी चर्चेत आले आहे.यापूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या ३४ शिक्षकांना नाशिक जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेऊ नये, या राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी केलेल्या ठरावाला विखंडित करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. आता पुन्हा जलयुक्त शिवार अभियानासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या १० टक्के सेसचा निधी राखून ठेवण्यात येऊ नये, हा भाजपा गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या ठरावाला विखंडित करण्यासाठी आता प्रशासन सरसावले आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार अभियानासाठी ‘त्या’ वर्षापुरतीच विभागीय आयुक्तांचे जिल्हा परिषदेला पत्र असल्याने यावर्षी १० टक्के निधी राखीव नसल्याचा दावा लघुपाटबंधारे विभागाच्या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या समक्षच काही दिवसांपुरती केला होता. मात्र जोपर्यंत जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू आहे, तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या सेसच्या एकूण निधीपैकी १० टक्के निधी जलयुक्त शिवार अभियानासाठी राखीव ठेवण्यावर प्रशासन ठाम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी त्याबाबत दुजोरा दिला असून, शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आणि जोपर्यंत योजना सुरू आहे, तोपर्यंत या योजनेवर सेसचा एकूण १० टक्के निधी राखीव ठेवण्याचे जिल्हा परिषदेवर बंधन असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रसंगी सभागृहातील ठराव विखंडित करण्याची वेळ आली तर तो ठराव विखंडित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.