शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन सुस्त : सेतू केंद्रचालक मेटाकुटीस

By admin | Updated: May 31, 2017 00:59 IST

सर्व्हर डाउनमुळे तीन हजार दाखले पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या महिन्यापासून धीम्या गतीने चालणाऱ्या महाआॅनलाइन या शासकीय दाखले तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिक शासकीय दाखले सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांकडे पडून असून, त्यातच मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालकांची दाखल्यांसाठी होणारी गर्दी पाहता, त्यामानाने जिल्हा प्रशासन सुस्त आहे.शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व अशा विविध दाखल्यांची गरज आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले मिळविण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार असताना प्रत्यक्षात गेल्या महिन्यापासून शासनाच्या ‘महाआॅनलाइन’चे सर्व्हर डाउन झाल्याने त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेतू व महा ई सेवा या केंद्रचालकांकडे तीन हजार दाखले पडून आहेत. सर्व्हर डाउन झाल्यामुळे दाखले तयार करण्यास विलंब होत असून, दिवसाकाठी दहा ते बारा दाखल्यांचीच नोंदणी या सर्व्हरमध्ये होत आहे. त्यामुळे जुने दाखलेच अद्याप तयार नसताना बुधवारपासून हजारोच्या संख्येने दाखल्यांसाठी अर्ज सादर झाल्यास काय करायचे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. गेल्या महिन्यापासून यासंदर्भात केंद्रचालकांनी महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयकापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. असाच प्रकार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये घडल्यानंतर तेथील जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रचालकांना त्यांच्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची मुभा दिली होती. नाशिक जिल्हा प्रशासन मात्र यासंदर्भात सुस्त असून, येणाऱ्या काळात शासकीय दाखल्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर काहीच कार्यवाही करण्यास तयार नसल्याची तक्रार केली जात आहे. बारावीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर दहावीचाही निकाल जाहीर होणार असून, काही शाखांमध्ये प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त असून, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे गेल्या तीन आठवड्यांपासून दाखल्यांसाठी अर्ज सादर केलेल्या पालकांचा तगादा वाढला आहे.