सटाणा:तालुक्यातील नामपूर बाजार समितीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२४ ) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ज्येष्ठ संचालक कृष्णा भामरे अध्यक्षस्थानी होते.फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी बाजार समिती प्रशासन भक्कमपणे उभे असल्याचे अध्यक्ष कृष्णा भामरे यांनी यावेळी सांगितले. शेतकर्यांच्या सोयीसाठी कांदा लिलाव केंद्राच्या सुमारे साडेचार एकर आवारात पेवर ब्लॉक बसविण्याचा महत्वपूर्ण यावेळी घेण्यात आला.सभापती हेमंत कोर, उपसभापती चारु शिला बोरसे, संचालक संजय भामरे, भाऊसाहेब भामरे, शांताराम निकम, आनंदा मोरे, भाऊसाहेब कांदळकर, अविनाश सावंत, डी डी खैरनार, दीपक पगार, मधुकर चौधरी, चंद्रभागाबाई शिंदे, सचिन मुथा, अविनाश निकम, दत्तू बोरसे यावेळी उपस्थित होते.सचिव संतोष गायकवाड यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले. गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीला २ कोटी ५ लाख रु पयांचे उत्पन्न मिळाले असून १कोटी ६८ लाख रूपये खर्च झाल्याने संस्थेला ३७ लाख २१हजार रूपये निव्वळ नफा झाला आहे. संस्थेला अ लेखापरीक्षण वर्ग मिळाला आहे. गेल्यावर्षी कांद्याच्या बाजार भावात झालेली घसरण व सुमारे ३० लाख रूपये निवडणूक खर्च यामुळे बाजार समितीच्या नफ्यात घट झाली.गेल्या दोन वर्षापूर्वी बाजार समितीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांची फरार कांदा व्यापारी अकील शेख याच्याकडे अडकलेली रक्कम काढण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा सूरु असून फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी बाजार समिती प्रशासन भक्कमपणे उभे असल्याचे अध्यक्ष कृष्णा भामरे यांनी यावेळी सांगितले. व्यापार्याकडे अडकलेली रक्कम मिळण्यासाठी पणन संचालकांकडे ठराव करावा अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली. सुमारे पावणे दोन कोटी रूपयांच्या विनियोगातून मार्केटच्या आवारात बांधण्यात येणार्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सटाणा बाजार समितीकडे अडकलेली 2 कोटी रूपयांची वसूली करणे, शेतकर्यांना माफक दरात भोजन उपलब्ध करून देणे, शेतकरी निवास बांधणे, कांदा व्यापार्यांकडे असणार्या वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करणे, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचा पुतळा उभारणे, पणन मंडळाच्या माध्यमातून धान्य गोदाम बांधणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी सरपंच अशोक पवार, माजी सरपंच जगदीश सावंत, प्रमोद सावंत, प्रवीण सावंत, बाजीराव सावंत, विनोद सावंत, दिपक सावंत, समिर सावंत, मधुकर कापडनीस, अमृत कापडनीस, शशिकांत सावंत आदींनी चर्चेत भाग घेतला. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले. संजय भामरे यांनी आभार मानले.
फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:17 IST
सटाणा:तालुक्यातील नामपूर बाजार समितीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२४ ) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ज्येष्ठ संचालक कृष्णा भामरे अध्यक्षस्थानी होते.फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी बाजार समिती प्रशासन भक्कमपणे उभे असल्याचे अध्यक्ष कृष्णा भामरे यांनी यावेळी सांगितले. शेतकर्यांच्या सोयीसाठी कांदा लिलाव केंद्राच्या सुमारे साडेचार एकर आवारात पेवर ब्लॉक बसविण्याचा महत्वपूर्ण यावेळी घेण्यात आला.
फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी प्रशासन
ठळक मुद्दे नामपूर : बाजार समितीची सर्वसाधारण सभा