शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील बदलांचा फेरबदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:18 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, मनविसेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करीत शिक्षण विभागाने या निर्णयासंबंधी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तसेच या योजनेत बदल झाल्यास मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे.

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, मनविसेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करीत शिक्षण विभागाने या निर्णयासंबंधी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तसेच या योजनेत बदल झाल्यास मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे.  सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत वाटप करण्यात येणाºया पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल करून थेट ठ्यपुस्तकाऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील, असे जाहीर केल्यामुळे आता विद्यार्थ्यांना बँकेत खाते खोलने बंधनकारक झाले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही यामुळे धोक्यात येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे सदर योजनेचा फेरविचार करावा अन्यथा मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे.  तसेच पाठ्यपुस्तके योजना आहे त्याच स्वरूपात चालू ठेवण्याची मागणीही मनविसेने शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष श्याम गोहाड, अतुल धोंगडे, अमर जमधडे, नितीन धानापुणे, शशिकांत चौधरी, प्रसाद घुमरे, स्वप्नील कराड, आदित्य कुलकर्णी, अमित पाटील, सूरज नलावडे आदी उपस्थित होते. अनेकांची आर्थिक क्षमता नाही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पदरचे पैसे खर्च करून पाठ्यपुस्तकांची खरेदी करून पावती सादर केल्यानंतर पैसे मिळणार आहे. परंतु अनेकजण आर्थिक क्षमता नसतानाही केवळ मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके मिळत असल्याने मुलांना शाळेत पाठवतात. अशा पालकांनी खात्यांवर पैसे येण्याआधी पाठ्यपुस्तके खरेदी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पाठ्यपुस्तकांचे पैसे पालकांच्या खात्यावर जमा होण्यास तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित केला आहे. पालकांकडे पैसे नसल्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आली होती.