शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कोळी महादेव समाजातर्फे दिंडोरी तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:09 IST

दिंडोरी: आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेतर्फे येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास शार्दूल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शांताराम चारोस्कर, मित्रमेळाचे जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, नगरसेविका आशाताई कराटे, देविदास वटाणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार पटांगण ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत मागण्यांचे नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आले. दिंडोरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था झाली असून त्याकडे लक्ष द्यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गाºहाणे मांडले असता त्यांनी नगरपंचायतीला सदर वास्तूची योग्य देखभाल दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतरही उपाययोजना होत नसल्याने मोर्चा काढण्याची वेळ आली असून सदर वास्तू आदिवासी समाजाच्या सामाजिक संस्थेकडे द्यावी. तसेच शासनाने आदिवासींच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये तसेच शासकीय वसतिगृहात लागू केलेले डीबीटी धोरण बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या .आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवुन सोयी, सुविधा उपलब्ध न करून दिल्यास पुन्हा असेच पाऊल उचलण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले. यावेळी आदिवासी युवकांकडून विविध घोषणा देण्यात आल्या.यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज आंडे, तालुका अध्यक्ष मोहन गांगोडे, भास्कर कराटे,संपत कराटे,तालुका उपाध्यक्ष अंकुश झनकर, भास्कर कराटे, चेतन धुळे, राजेंद्र गांगुडे, राजेंद्र भवर, शंकर गांगोडे, प्रकाश वाघ, सागर चारोस्कर, कृष्णा भगरे, खंडेराव गाढवे, भगवान डंबाळे, चंदू गीते, संपत कराटे, योगिनी सितान, शीतल बोंबले आदींसह दोनशे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. दिंडोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Morchaमोर्चा