शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची दिवाळी झाली गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:29 IST

मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनतर्फे ‘एक भेट मोलाची, सामाजिक ऋ णाची’ या उपक्र मांतर्गत आदिवासी पाड्यावरील बांधवांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ, कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत संस्थेकडून आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

नाशिक : मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनतर्फे ‘एक भेट मोलाची, सामाजिक ऋ णाची’ या उपक्र मांतर्गत आदिवासी पाड्यावरील बांधवांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ, कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत संस्थेकडून आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. बालकांना कपडे व महिला व ज्येष्ठांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. संस्थेने हैदपाडा, हैदुलीपाडा येथील बांधवांच्या वाड्या-वस्त्यांवर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही कपडे व ब्लँकेटची भेट देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, बापू ताजनपुरे, गजानन चव्हाण, रेवण कांगणे, प्रशांत पाटील, सचिन सोर, डॉ. शरद गायकवाड, सचिन चिखले, अनिल गायखे, धनंजय सरक, दत्तात्रय अलगट, अतुल ब्रह्मेचा, अशोक थेटे आदींनी दिवाळीचा आनंद घेतला.  जयहिंद कॉलनी, बहुद्देशीय संस्था  सिडको परिसरातील महाजननगर येथील जयहिंद कॉलनी, बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हाडपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आदिवासी समाजबांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने आदिवासी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रतिभा पवार, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, दिलीप राऊत, नितीन चौधरी, दिलीप वाघ, प्रभाकर भाकरे, मिलिंद वाणी, शकुंतला चव्हाण, शोभा वाघ, हेमलता पाटील आदी उपस्थित होते.श्री स्वामिनारायण शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्रशासक माधवप्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल उपस्थित होते. यावेळी कन्या विद्यालयात मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यात फराळाच्या वस्तू वाटप करून गोरगरिबांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.