शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आवर्तनासाठी आदिवासींचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:08 IST

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा पाठिंबा : गेट नादुरु स्त असल्याने पाणी सोडण्यास अडचणी

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.दरम्यान, लघुपाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता अभिजित रौंदळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. पाणी सोडण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले; परंतु गेट नादुरु स्त असल्याने पाणी सोडण्यात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून दि. २४ व २५ जानेवारी रोजी रब्बी पिकासाठी पाणी सोडले होते; मात्र देवळी वणी व बोरदैवत येथील ग्रामस्थांनी जबरदस्तीने करून पाणी बंद केल्याने या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील अंबिका ओझर या गावाला पाणी पोहोचलेच नाही.अंबिका ओझरपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रयत्न केले; परंतु काही शेतकरी बांधवांनी अटकाव केल्याने पाणी पोहोच करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरला. अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. रब्बीचे गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिके केली आहेत. या पिकांना शेवटचे पाणी द्यावयाचे आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पिकांना पाणी देणे शक्य नाही. म्हणून अंबिका ओझर येथील शेतकºयांनी पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी पाणी वापर संस्थेमार्फत पैसेही भरले आहेत. या पिकांना तत्काळ पाण्याची गरज आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कळवण येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर रामदास खिल्लारी, सरपंच गीताबाई खिल्लारी, इंदिराबाई भोये, मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, पांडुरंग भोये, कांतिलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, विक्र म भोये यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बोरदैवत लघु पाटबंधारे प्रकल्पाची क्षमता ५८ दशलक्ष घनफूट असून, आजमितीस २३ दशलक्ष घनफूट शिल्लक साठा आहे. पाणी सोडणे व बंद करण्यात गेट नादुरु स्त असल्याने अडचणी येतात. दि. २५ जानेवारी रोजी पाणी सोडले होते; मात्र स्थानिक नागरिकांनी दांडगाई करून पाणी बंद केले.- अभिजित रौंदळसहायक अभियंता, कळवण