शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आधीच पडून दोन झाडू, तरीही औरंगाबादला गेले भिडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:17 IST

नाशिक : शहरात सफाईची कामे करण्यासाठी महापालिकेकडे अनेक वर्षांपासून दोन यांत्रिक झाडू असून, त्याचा पालिकेकडून वापर केला जात नसल्याने एक खत प्रकल्पावर, तर दुसरा भांडारात वापराविना पडून आहे

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात सफाईची कामे करण्यासाठी महापालिकेकडे अनेक वर्षांपासून दोन यांत्रिक झाडू असून, त्याचा पालिकेकडून वापर केला जात नसल्याने एक खत प्रकल्पावर, तर दुसरा भांडारात वापराविना पडून आहे. असे असतानाही महापालिकेतील मुखंड औरगांबादच्या झाडूच्या पाहणीसाठी गेल्याने महापालिकेतील जाणकारच बुचकळ्यात पडले आहेत. आजवर सफाई कामगारांच्या विरोधामुळे आणि त्यातील दोषांमुळे महापालिकेकडे उपलब्ध असलेला एकही झाडू वापरात नसताना आणखी सहा झाडू खरेदी करण्याचे घाट घातले जात आहेत, हे विशेष होय!  नाशिक शहराचा वाढता विस्तार आणि सफाई कामगारांची मर्यादित संख्या यामुळे शहरात यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा विषय वेळोवेळी चघळला गेला आहे. महापालिकेने यांत्रिक झाडू खरेदी करायचा केवळ विचार मांडला तरी त्यास सफाई कामगार संघटनांकडून विरोध केला जातो. यानंतरही महापालिकेने २००२ मध्ये शिवाजीरोडवर यांत्रिक झाडूंची प्रात्यक्षिके बघितली, त्यानंतर दोन यांत्रिक झाडू खरेदी केले. हे झाडू महापालिकेच्या खत प्रकल्पावर ठेवण्यात आले होते. परंतु त्याचा फारसा उपयोग केला जात नव्हता. दरम्यान, २०१३ मध्ये नगरसेवक विक्रांत मते यांनी प्रभाग क्रमांक २१ मध्ये यांत्रिक झाडूचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेने त्यांना परवानगी दिल्यानंतर सुमारे महिनाभर या प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री ११ ते पहाटे पाच या वेळात स्वच्छता करण्यात येत असे. ही पद्धत चांगली असल्याने आणखी यांत्रिक झाडू देण्याची मागणी मते यांनी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे केली होती. ती पूर्ण झाली नसली तरी त्यानंतर अगदी एका वर्षापूर्वीपर्यंत सातपूर येथे काही मार्गांवर या झाडूने साफसफाई केली जात होती, असे मते यांनी सांगितले. दुसरीकडे सातपूर विभागातही या झाडूचा वापर कमी कमी होत गेल्याने तो भांडारात जमा असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.  दुसरा यांत्रिक झाडू आजही खतप्रकल्पावर पडून आहे. यांत्रिक झाडूने धूळ खूप उडते त्यामुळे त्याचा वापर केला जात नसल्याचे खतप्रकल्पावरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या दोन झाडूंचाच वापर केला जात नसताना लवाजमा थेट औरंगाबाद महापालिकेत यांत्रिक झाडूची पाहणी करण्यासाठी गेल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.