शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:53 IST

आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आडगाव : आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी वाढत्या रहदारीचा विचार करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आता हा रस्तादेखील अपुरा पडत आहे. शिवाय या रस्त्यालगत अनेक शाळा, कॉलेज व प्रशासकीय कार्यालयदेखील आहे. रस्ता कमी रुंदीचा व वळणाचा असल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असतात. आडगाव-म्हसरूळ रस्त्यालगत मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेज, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस कर्मचारी वसाहत, आरोग्य विज्ञानपीठ व दिंडोरीरोडला जोडला जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस कर्मचारी व स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. पण हा रस्ता कमी रुंदीचा असल्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आडगाव परिसरातील अपूर्ण असलेले रिंगरोड जोडल्यास महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल. आडगाव-म्हसरूळ रस्त्याला जोडणारे काही रिंग रोडदेखील अपूर्ण आहेत.  या परिसरातील हे संपूर्ण रिंग रोड जोडल्यास मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक गरजेच्या ठिकाणी वळवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे शक्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाय त्यामुळे परिसराच्या विकास होण्यास मदत होईल.  आडगाव ते गिरणारे हा रस्ता पूर्वीच मंजूर करण्यात आला होता. त्यातील म्हसरूळ ते गिरणारे रस्ता पूर्ण झाला आहे. त्यानंतर रखडलेल्या आडगाव-म्हसरूळ रस्त्याचे अजूनही रुंदीकरण झाले नाही.या रस्त्यालगत शाळा ,कॉलेजेस व प्रशासकीय कार्यालये असल्यामुळे कायम वर्दळ असते. शिवाय रस्ता वळणाचा असल्याने अनेक अपघात होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष देऊन त्वरित रुंदीकरण करण्यात यावे. - रामभाऊ जाधव, रहिवासी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी