शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव-म्हसरूळ रस्ता बनला धोकादायक; अपघाताच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:16 IST

आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्मजवळील नाल्यावरील रस्त्याचा संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या जवळ नाला तयार झाला असून, या वळणावर अनेक छोटे-मोठे अपघात होतात;

नाशिक : आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्मजवळील नाल्यावरील रस्त्याचा संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या जवळ नाला तयार झाला असून, या वळणावर अनेक छोटे-मोठे अपघात होतात; पण या समस्येकडे स्थानिक नगरसेवक व प्रशासन यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वळणावरील रोडवर संरक्षक कठडा बांधून नाला बुजविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.  आडगाव-म्हसरूळ रस्त्यावरील ओंकार फार्मजवळील धोकादायक वळणावर असलेल्या रस्त्यालगत असलेला संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे कोसळून बाजूची माती वाहून गेल्याने रस्त्यालगत नाला तयार झाला आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांची अनेक वेळा तारांबळ उडते. शिवाय वळण धोकादायक असल्याने अनेक वेळा अपघातदेखील घडतात. शिवाय हा रस्ता मुंबई-आग्रा महामार्गापासून दिंडोरी, पेठ, गिरणारे, त्र्यंबक, गुजरात या मार्गाकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे नेहमीच या मार्गावर वर्दळीमुळे लोकांचा राबता असतो, शिवाय मेडिकल कॉलेज व रु ग्णालय, ग्रामीण पोलीस मुख्यालय, पोलीस वसाहत, मेट कॉलेज, नर्सिंग कॉलेज अशी कॉलेजेस व प्रशासकीय कार्यालये असल्यामुळे या रस्त्यावर कायम मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी कठडा नसल्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी रस्त्यावर संरक्षक कठडा बांधावा किंवा नाला बुजवावा, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.पावसामुळे रस्ता  लक्षात येत नाही  आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्म येथील नाल्याजवळील रस्त्यावरील कठडा नाहीसा झाला असून, मुसळधार पावसात पाणी वाहत असते. अशा वेळेस रस्त्याची व पाण्याची लेव्हल एकसारखी असल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची भीती निर्माण होते.अनेक ठिकाणचे पथदीप गायबआडगाव-म्हसरूळ रस्त्यावरील अनेक ठिकाणी खांब उभे करूनही पथदीप बसविण्यात आलेले नाही तर काही ठिकाणी दाट झाडांमुळे प्रकाश पडत नाही, त्यामुळे गरजेच्या ठिकाणी झाडांची छाटणी करून पथदीप नसलेल्या ठिकाणी ते बसविण्यात यावे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा