शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:08 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे.

ठळक मुद्देआयएमएची मागणी : समस्यांकडे वेधले लक्ष

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन त्वरित ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करावा, अशी अपेक्षा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आली आहे.शहरातील कोरोनाबाधितांवरील उपचाराच्या अनुषंगाने सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए प्रतिनिधींबरोबर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठक घेतली. यावेळी नाशिककरांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आयएमएच्या वतीने आश्वासन देण्यात आले.रेमडेसिविर टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर औषधांची शिफारस योग्य प्रकारे केली जात आहे किंवा कसे, हे डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासले तर अनावश्यक मागणी दूर होईल तसेच योग्य त्या रुग्णांना पुरवठा करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचा पाठपुरावा करण्याचे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये प्रबोधनाचे आश्वासनही आयएमएच्या वतीने देण्यात आले.वैद्यकीय व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणींकडे असोसिएशनने लक्ष वेधले आणि रेमडेसिविर तसेच ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.जिल्हा प्रशासनाची यंत्रणा व डॉक्टरांची यंत्रणा एकत्रितरीत्या या औषधांची शिफारस, वापरण्यात तसेच वितरण या सगळ्या बाबींवर लवकरच प्रभावी नियंत्रण आणेल.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCorona vaccineकोरोनाची लस