नाशिक : देशातील शेती आधुनिक स्थापत्याला विद्यार्थ्यांच्या संशोधनाची जोडराज्यस्तरीय ‘आकार २०१५’ स्पर्धाव्यवसायाची बिकट अवस्था आणि दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता नदीजोड प्रकल्पाची आवश्यकता, अत्याधुनिकतेचा संशोधनात्मक आविष्कार, बांधकाम क्षेत्रातील तसेच आपत्तीकाळातील व्यवस्थापन, भूजलपातळीत वाढ होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांची आवश्यकता अशा एक ना अनेक प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी ‘आकार २०१५’ या राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत केले.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई आणि गुरूगोविंद सिंग तंत्रनिकेतन विद्यालय, नाशिक यांच्या संयुक्तविद्यमाने ‘आकार २०१५’ या राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३०० तंत्रनिकेतन महाविद्यालयांकडून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून ६० प्रवेशिकांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. येथील गुरूगोविंद तंत्रनिकेतन महाविद्यालयात नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयांना आपले प्रेझेंटेशन सादर करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत निवड समितीकडून ३६ पेपरची निवड करण्यात आली. या स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक महाविद्यालयातील शुभम पाटील आणि हर्ष शाह यांना प्रथम क्रमांक, महात्मा गांधी मिशन तंत्रनिकेतन, औरंगाबाद येथील मोहम्मद बिलाल याला द्वितीय, तर संदीप तंत्रनिकेतन महाविद्यालयातील हितेश शेवाळे यास तृतीय क्रमांक मिळाला.या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालयाचे सहसंचालक ज्ञानेश्वर नाठे, तर गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतनचे अध्यक्ष गुरुदेवसिंग बिर्दी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एमईटीचे विभागप्रमुख जी. बी. कावळे, शासकीय तंत्रनिकेतनचे आर. जी. सोनवणे, पाटबंधारे विभागाचे अभियंता व्ही. एस. भागवत, तसेच वास्तुविशारद पी. जी. कारखानीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)
आधुनिक स्थापत्याला विद्यार्थ्यांच्या संशोधनाची जोडराज्यस्तरीय ‘आकार २०१५’ स्पर्धा
By admin | Updated: October 4, 2015 22:49 IST