शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विज्ञान-अध्यात्माची सांगड घालावी

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

पंकजा मुंडे : सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे ध्वजारोहण

नाशिक : मानवाचे कल्याण साधण्याचे कार्य धर्म करतो. प्रत्येक धर्म, पंथ, संपद्राय आणि भक्ती यांची रूपे वेगवेगळी असली तरी, मानवाचे कल्याण हाच सर्वांचा उद्देश आहे. तरुण पिढी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असली तरी जीवनात आत्मशांतीसाठी अध्यात्माची गरज आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालण्याची आवश्यकता आहे, असे विचार राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्रामधील स्वामी प्रा. डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जनतेची भक्ती ज्यामागे आहे तोच खरा श्रेष्ठ धर्म होय. आमच्यासाठी लोककल्याण, लोकसेवा हाच धर्म असतो. विज्ञान तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जीवनात प्रचंड सुखसोयी आल्या; परंतु मनाची शांती नष्ट होत आहे. यासाठी धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून हे कार्य साधले जाते, असेही त्यांनी सांगितले. लोककल्याणाचे कार्य करताना वाईट प्रवृतींशी संघर्ष करण्यासही आपण तयार आहोत. एक संवेदनशील स्त्री म्हणून माझ्या हातून जनतेचे आणि धर्माचे कार्य घडो, अशी प्रार्थना त्यांनी केली. महापौर अशोक मुर्तडक यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांचा आढावा घेऊन, राज्य सरकारकडे आणखी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केले. प्रा. डॉ. गुट्टे महाराज यांनी सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या कार्याचा आढावा घेतला. या सोहळ्यास आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, हेमंत धात्रक, लक्ष्मण सावजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, सुनील केदार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी संजीव अहिरे यांनी परिचय करून दिला. सोमनाथ बोडके यांनी सूत्रसंचालन केले. श्याम पिंपरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास दामोदर मानकर बाळासाहेब पालवे, बुधाजी पानसरे आदि उपस्थित होते.