शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आनंदी सहवास संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST

सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुमारे २०० मुलांना दत्तक योजनेत वह्या, पुस्तके व शालेय बॅग यांचे वाटप करण्यात आले.

नाशिक : सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे.आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुमारे २०० मुलांना दत्तक योजनेत वह्या, पुस्तके व शालेय बॅग यांचे वाटप करण्यात आले. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमात यंदा आदिवासी भागातील १६१ आणि नाशिक शहरातील ४० मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येत आहे. या संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक साहित्य खरेदीबरोबरच जी मुले वरच्या वर्गात गेल्यावर आपली चांगल्या स्थितीतील पुस्तके व शालेय बॅग (दप्तर) वापरत नाहीत, अशा इंग्रजी शाळेतील मुलांकडून सदर बॅग्ज संकलित करून त्या आदिवासी भागातील गरजू मुलांना देण्यात आल्या. यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी देवसाने, शिंदेपाडा, मोरवाणपाडा, चरणपाडा, उपळीपाडा या आदिवासी भागात जाऊन शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे मेरी येथील जोशी आठवले या शाळेतील ४० मुलांना दत्तक घेऊन विविध शैक्षणिक साहित्याची मदत केली. या उपक्रमात आनंद सहवास संस्थेचे मंजूषा सोनार, मयूर मराठे, प्रतिभा सोनार, हेमंत पवार, रोहन विसपुते, सागर सावरगावकर, हेमंत राजगुरु, शीतल परब, मुकेश चव्हाण, मुक्तार कुरेशी, अजित थोरात, किशोर सोनार आदि सहभागी झाले होते.मुलांचे चेहरे आनंदाने फुललेआदिवासी भागातील मुले पाड्यावरून लांब अंतरावर पायपीट करीत शाळेत जातात. त्यांच्याकडे वह्या पुस्तके ठेवल्यासाठी कापडी पिशवी असते. काही विद्यार्थ्यांकडे मात्र कापडी पिशवीदेखील नसल्याने वह्या पुस्तके पावसात भिजतात. हातातून पाण्यात किंवा चिखलात पडतात. मात्र या मुलांना स्कूल बॅग्ज (दप्तर) दिल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला, असे संस्थेचे प्रमुख किरण सोनार यांनी सांगितले.