शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला कारवाई : रहिवासी भागातील मोठी कारवाई पक्क्या घरांचे बांधकाम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:46 IST

सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी (दि.८) धडक मोहीम राबवित पोलीस बंदोबस्तात सातपूर कॉलनीतील सुमारे १२ घरांचे पक्के वाढीव बांधकाम हटविण्याची कारवाई केली.

ठळक मुद्देरहिवासी भागातील ही सर्वात मोठी कारवाईताफा पोलीस बंदोबस्तात श्रीकृष्णनगरात दाखल

सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी (दि.८) धडक मोहीम राबवित पोलीस बंदोबस्तात सातपूर कॉलनीतील सुमारे १२ घरांचे पक्के वाढीव बांधकाम हटविण्याची कारवाई केली. सातपूर परिसरात रहिवासी भागातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगरमध्ये नागरिकांच्या तक्रारींवरून आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचा ताफा पोलीस बंदोबस्तात श्रीकृष्णनगरात दाखल झाला. या मोहिमेचे नेतृत्व विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले. श्रीकृष्णनगरातील रहिवाशांनी आपल्या घरापुढे बांधलेली पक्की आरसीसी बांधकामे पोलीस बंदोबस्तात जेसीबीने हटविण्यात आली. काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी अगोदर कळविले नाही म्हणून वेळ मागितला. परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावत कारवाई पूर्ण केली. यातील बहुतांश नागरिकांनी सुसज्ज असे बांधकाम केलेले होते. तर काहींचे बांधकाम खूप जुने होते. रहिवासी भागात जाऊन धडक कारवाई करण्याची ही पहिलीच कारवाई मानली जात आहे. या कारवाईत महानगरपालिकेच्या सातपूर, सिडको आणि पूर्व नाशिक विभागातील ३० कर्मचारी आणि नगररचना विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मोहीम सुरू होती.आपापसातील वादआपापसातील वादामुळे शेजाºयांनी दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागात वाढीव बांधकामाचे लेखी तक्र ार केली होती. यापूर्वी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मोहीम राबविण्यापूर्वी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वाढीव बांधकामाची पाहणी केली होती. त्यानंतरच ही मोहीम राबविण्यात आली. वाढीव बांधकामे पाडत असताना काहींनी हळहळ व्यक्त केली तर काहींनी समाधान व्यक्त केले. आपापसातील वादामुळे नाहक नुकसान झाल्याची चर्चाही उपस्थितांमध्ये रंगली होती.