शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पिंपळगाव बसवंत उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:48 IST

पिंपळगाव बसवंत : येथील उंंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे राज्य उत्पादक शुल्क विभाग व दारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला माल शस्त्रशंचा धाक दाखवित वाहनासह पुन्हा पळविण्याचा प्रकार दारु बंदी विभागाच्या पथकाने हाणून पाडला.

ठळक मुद्देदारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा माल जप्त

पिंपळगाव बसवंत : येथील उंंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे राज्य उत्पादक शुल्क विभाग व दारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला माल शस्त्रशंचा धाक दाखवित वाहनासह पुन्हा पळविण्याचा प्रकार दारु बंदी विभागाच्या पथकाने हाणून पाडला.बुधवारी (दि.१६) नाशिक-देवळा रोडवरील खेलदरी ता.चांदवड भागात परराज्यातुन मद्याची विक्र ीकरण्याकरीता एक ट्रक येणार असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आयुक्त अश्विनी जोशी, सुनिल चव्हाण, प्रसाद सुर्वे, चरणसिंग राजपुत याच्या मार्गदर्शनाखाली साफळा रचत एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक (जी जे ३१ टी १५४९) अडवून तपासणी केली असता दमण राज्य निर्मीत रॉयल स्पेशल ओल्ड व्हिस्कीच्या १८० एम.एल.च्या २४००० बाटल्या, जॉन मार्टिन प्रिमीयर व्हिकि १८० एम.एल.च्या १९२० बाटल्या, किंगफिशर स्टॉग बियरचे १३८०० टिन तसेच टाटा ट्रक, एक स्विप्ट डिझायर (जी जे १५ सीजी ५७९९) असा सुमारे ६५ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.याप्रकरणी जावेद अल्लाऊद्दीन तेली (रा.नवापुर जि.नंदुरबार), अमर कैलास वर्मा (नवापुर ), राहुल राजु गायकवाड (रा. चिंचबन, पंचवटी, नासिक), शरद नारायण ठाकुर (रा. विजलपोर ता. जलालपोर. जि. नवसारी, गुजरात) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान हा जप्त केलेला माल नाशिक येथे आणत असताना मिलिंद मधुकर पवार (रा. चिचबन, मालेगाव स्टॅन्ड, नाशिक) व त्याचे चार सहकारी यांनी महिंद्रा झायलो गाडीतुन पिंपळगाव बसवंत येथील वणी उड्डाण पुलावर दुपारी तीनच्या सुमारास हा ट्रक अडविला आणि उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्रांचा धाक दाखवून ट्रकमधून उतरवून देत ट्रक पिंपळगाव बसवंत येथील सर्व्हिसराडने उंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे रस्ता न सापडल्याने अडखळला याच दरम्यान उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करीत सदरचा ट्रक पुन्हा ताब्यात घेत नाशिक येथे नेण्यात आला. या वेळी या भागात साध्या वेशातील अधिकारी, सरकारी वाहने यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. या कारवाईत उप आयुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक एम. बी. चव्हाण, देवदत्त पोटे, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दिपक आव्हाड, विठ्ठल हाके, सोन्याबापु माने, अमन तडवी, महेश सातपुते, गोरक्षनाथ आहिरे, संतोष कडलक, अवधुत पाटील, विजेंद्र चव्हाण, गणेश शेवगे, पांडुरंग वाईकर, सुनिल दिघोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.(फोटो १७ पिंपळगाव बसवंत)