पंचवटी : परिसरातील गुन्हेगारांचे फलक, तसेच त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावणाऱ्यांचा शोध घेऊन पंचवटी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारीवर आळा बसावा तसेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पंचवटीत अनेक गुन्हेगारांशी संबंधित टोळ्या असून, या टोळीतील म्होरके सराईत गुन्हेगारांच्या व गुन्हेगारीशी संबंधित असलेल्यांचे फलक लावून एकप्रकारे दहशत व वर्चस्व निर्माण करण्याचे काम करतात. यापुढे गुन्हेगारी टोळीतील गावगुंडांचे फोटो फलकावर लावणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधित गुन्हेगारांवर व फलक लावणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. (वार्ताहर)
गुन्हेगारांचे फलक झळकल्यास कारवाई
By admin | Updated: July 28, 2016 01:01 IST