शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:46 IST

नाशिक : येवला पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णय घेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देयेवला : पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकाºयांना दणकाया कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले

नाशिक : येवला पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णयघेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्या उपस्थितीत येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात आढावा बैठक घेण्यातआली. यावेळी डॉ. गिते यांनी कुपोषणाबाबत सर्व यंत्रणेला मार्गदर्शन केले. त्यांनी धडक तपासणी मोहीम राबवून केलेल्या तपासणीत येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील कंत्राटी ग्रामसेविका अर्चना आव्हाड २०१२ पासून अनधिकृत रजेवर असल्याची बाब बैठकीत उघडकीस आली.  याबाबत सदर ग्रामसेविकेस वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मार्च २०१५ मध्ये अंतिम नोटीस बजावूनदेखील सदर ग्रामसेविकेने कोणताही खुलासा सादर केला नाही. त्यामुळे अनधिकृत रजेवर असलेल्या ग्रामसेविका आव्हाड यांना सेवामुक्त करण्यात आले. तसेच कुसुमाडी दगडीचा माळ, नायगव्हाण, धामोडे व नगरसूल येथील अंगणवाडी बांधकामात अनियमितता असणाºया व यासाठी जबाबदार असणाºया बांधकाम विभागातील तत्कालीन शाखा अभियंता व्ही. बी. वाईकर (सेवानिवृत्त), के. ई. उशीर व पी. एम. सोनवणे या तिघांवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना गिते यांनी दिल्या.सोमठाण देश येथील सिंचन विहीर पूर्ण असून व मोजमाप पुस्तिका भरूनही अद्याप बिल सादर न करणाºया ग्रामसेवकाबाबत ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन व संबंधित लाभार्थीकडून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनधिकृत गैरहजर असलेल्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता थविल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले.बैठकीच्या सुरु वातीलाच ग्राम बालविकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहारसंहिता याबाबत डॉ. गिते यांनी आढावा घेतला. जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच ग्रामसेवकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे निर्देश गिते यांनी दिले. मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना सुट्या घ्यावयाच्या असतील तर त्यांना मुभा असून, ज्या अंगणवाडी सेविकांना ग्राम बालविकास केंद्राचे काम करावयाचे असेल त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करावे, असेही डॉ. गिते म्हणाले.  माहिती घेऊन कारवाईच्या सूचना सोमठाण देश येथील सिंचन विहीर पूर्ण असून, मोजमाप पुस्तिका भरूनही अद्याप बिल सादर न करणाºया ग्रामसेवकाबाबत ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन व संबंधित लाभार्थीकडून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनधिकृत गैरहजर असलेल्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता थविल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले.