शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई : रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या टपऱ्या हटविल्याने परिसर झाला मोकळा सिन्नरला रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:09 IST

सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली.

ठळक मुद्देपालिकेच्या वतीने दवंडी देऊन आवाहन केले जात होतेपालिकेचा ताफा बसस्थानक परिसरात हजर झाला

सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली. दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्याने परिसर मोकळा झाला. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीस लागून व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांनी आपापली अतिक्र मणे स्वत:हून काढून घ्यावीत यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पालिकेच्या वतीने दवंडी देऊन आवाहन केले जात होते. मात्र या आवाहनास प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नगरपालिकेचे करनिरीक्षक तथा कार्यालय अधीक्षक विष्णू क्षत्रिय, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख नीलेश बाविस्कर यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचा ताफा बसस्थानक परिसरात हजर झाला. वाजे विद्यालयास लागून असलेल्या रस्त्यावर एका बाजूने व्यवसाय करावा, दुसरी बाजू मोकळी सोडावी, असे नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही अतिक्रमणे काढणार नाही. मुख्याधिकारी आल्यानंतर काय तो निर्णय घेऊ, अशी ठाम भूमिका व्यावसायिकांनी घेतल्याने प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम येथे थांबविण्यात आली. फुले परिसरातील सुमारे १५-२० टपºया हटविल्याने महात्मा फुले पुतळ्याने मोकळा श्वास घेतला. टपºयाखाली टाकलेला भरावही नगरपालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने दूर करून रस्ता साफ करण्यात आला.दरम्यान, काजीपुरा भागात महात्मा फुले विद्यालयाच्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या भंगारांची दुकाने हटवून हा रस्ता मोकळा करण्यात आला. ४ ट्रॅक्टर, १ जेसीबी, ५० कर्मचारी असा ताफा अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेने सज्ज ठेवला होता. मात्र बहुतेक व्यावसायिकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून टपºया, गाडे हटविले. अतिक्रमण मोहिमेत आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, अशोक कट्यारे, भूषण नवाल, दीपक भाटजिरे, विजय वाजे, जगदीश वांद्रे, सतीश शिंदे, मंगेश आहेर, कैलास शिंगोटे आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.