शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई : रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा पुरवठा अधीक्षक सेवेतून निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:40 IST

शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या संगणकाशी जोडण्याच्या कामासाठी रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख याला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला

ठळक मुद्दे नाशिकरोड येथे प्रकार घडला पैसे मोजत असल्याचे चित्रीकरण खात्यावर असलेला दबदबा लक्षात

नाशिक : शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या संगणकाशी जोडण्याच्या कामासाठी रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख याला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या कारवाईची चाहूल लागताच, शेख याने काही विशिष्ट समाजातील लोकांना एकत्र करून जिल्हाधिकाºयांवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे शेख याच्या भावालाही पुरवठा खात्याच्या अशाच एका कारणावरून अलीकडेच निलंबित करण्यात आले आहे.शहर धान्य वितरण कार्यालयाच्या नाशिकरोड येथे हा प्रकार घडला आहे. काही रेशन दुकानदारांनी कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख हा पैशांची मागणी करीत असल्याचे व पैसे मोजत असल्याचे चित्रीकरण करून ते फेसबुकवर व्हायरल केल्याने ‘लोकमत’मध्ये त्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याची दखल घेत पुरवठा खात्याने कारवाई सुरू केली आहे. शेख याने शिपाईपदापासून ते थेट कार्यालयीन अधीक्षकापर्यंत केलेली सेवा पुरवठा खात्यातच बजावली असून, त्याच्याकडेच नायब तहसीलदारपदाचा पदभारही सोपविण्यात आला आहे. यावरून त्याचा या खात्यावर असलेला दबदबा लक्षात यावा. शेख याचा भाऊ जे. डी. शेख हादेखील निफाड तालुक्यात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असून, गेल्या महिन्यात ग्रामस्थांनी रेशनचे काळाबाजारात जाणारे धान्य पकडून दिले असता, पोलिसांनी पुरवठा निरीक्षक जे. डी. शेख याला सदर धान्याबाबत पत्र दिले असता, त्याने सदरचे धान्य रेशनचे नसल्याचा परस्पर अहवाल देऊन टाकला. परिणामी पोलिसांनी धान्य सोडून दिले. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाने चौकशी करून जे. डी. शेख याला सेवेतून निलंबित केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख याने केली आहे.आकसापोटी खोटे आरोप केल्याचा दावाकाही विशिष्ट समाजातील व्यक्तींनी एकत्र येत जिल्हाधिकाºयांची भेट घेतली व ए. डी. शेख हा अल्पसंख्याक समाजाचा असल्यामुळे रेशनदुकानदार आकसापोटी खोटे आरोप करीत असल्याचा दावा केला. परंतु जिल्हाधिकाºयांनी या शिष्टमंडळाला चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. या सर्व गोष्टींची प्रशासनाने गंभीर दखल घेत ए. डी. शेख याला निलंबित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.