शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला बिंगो जुगाराच्या पैशावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:55 IST

नाशिकरोड : अवैध धंदे व बिंगो बंद असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा दोन दिवसांपूर्वी सुभाषरोड येथे बिंगो जुगार पैशाच्या वसुलीवरून दोन गटात झालेल्या मारामारीवरून फोल ठरला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे च्नाशिकरोड परिसरात सर्वत्र जुगार, मटका आदी अवैध धंदे सर्रासपणे सुरू

नाशिकरोड : अवैध धंदे व बिंगो बंद असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा दोन दिवसांपूर्वी सुभाषरोड येथे बिंगो जुगार पैशाच्या वसुलीवरून दोन गटात झालेल्या मारामारीवरून फोल ठरला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.गोसावीवाडी येथील शहानवाज मुश्ताफ सय्यद याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वत: शहानवाज, चुलत भाऊ आदिल सय्यद व त्यांचा मित्र विशाल मानकर हे १५ दिवसांपूर्वी बिंगो नावाच्या जुगारावर दोन लाख ७० हजार रुपये जिंकले होते. जिंकलेले पैसे घेण्यासाठी गेल्या गुरुवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जियाउद्दीन डेपो येथे रिजवान रईस खान याने पैसे देण्यास नकार दिला. रिजवान, नियामत खान इरफान ऊर्फ इप्प्या याने शहानवाज याच्या डोक्यावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. शहानवाज याच्या सोबत असलेले आदिल सय्यद व वसीम सय्यद यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालधक्का रोड येथील अल्तम अजिम शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जियाउद्दीन डेपो अकबर सोडा शॉप येथे मित्र रिजवान खान बसलेला होता. यावेळी आदिल सय्यद, तौसीफ सय्यद, वसीम सय्यद, शानू सय्यद सर्व रा. गोसावीवाडी यांनी तेथे येऊन १५ दिवसांपूर्वी बिंगो जुगारावर हरलेले १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करून ते पैसे न दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तोंडावर फायटर मारून जखमी केले. फिर्यादी अल्तमचा भाऊ इरफान व मामा नियामत खान यांनादेखील मारहाण करून दुकानाच्या गल्ल्यातील १२ हजार ९८० रुपये जबरी चोरी करून चोरून घेऊन गेले. तसेच संशयितांनी केलेल्या दगडफेकीत अश्पाक अन्सारी याच्या हाताला दुखापत झाल्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंदे सर्रासपणे सुरू च्नाशिकरोड परिसरात सर्वत्र जुगार, मटका आदी अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. बिंगो नावाचा जुगार युवा पिढी मोबाइलवरून खेळत असून त्याची माहितीदेखील पोलिसांना आहे. मात्र अर्थपूर्ण संबंधामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. फक्त वरिष्ठांना दाखविण्यासाठी छोट्या-मोठ्या कारवाया केल्या जातात.