शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

गर्भपातप्रकरणी कारवाई

By admin | Updated: February 21, 2017 00:47 IST

गुन्हा दाखल : मनपाच्या पथकाकडून शिंदे हॉस्पिटल सील

नाशिक : बेकायदेशिपणे गर्भलिंगनिदान करत महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी मुंबईनाका येथील शिंदे हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम निंबा शिंदे यांच्याविरुद्ध महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून शिंदे हॉस्पिटल सील केले असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, डॉ. बी. एन. शिंदे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने २५ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. डेकाटे यांनी सांगितले, मनपाचे वैद्यकीय तपासणी पथकाने शिंदे हॉस्पिटलची तपासणी केली असता, सदर हॉस्पिटल हे नर्सिंग होम अ‍ॅक्टनुसार नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले. विनापरवाना हॉस्पिटल चालविले जाऊन त्याठिकाणी शस्त्रक्रियाही होत असल्याचे उपलब्ध साधनसामुग्रीवरुन लक्षात आले. पथकाला गर्भपात केलेली सदर महिला रुग्णही त्याठिकाणी उपचार घेताना आढळून आली. यावेळी हॉस्पिटलचे डॉ. शिंदे यांचेसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याशिवाय, पथकाने या महिलेवर उपचार करणारे डॉ. विजय थोरात, भूलतज्ज्ञ डॉ. विजय पिचा,डॉ. सचिन जाधव यांचीही चौकशी करुन जाबजबाब नोंदविले आहेत. यावेळी मुंबई नाका पोलिसांचीही मदत घेण्यात आली. डॉ़ शिंदे यांनी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही़ तसेच त्यांच्या वैद्यकीय पदव्यांबाबतही महापालिकेच्या पथकाला शंका आहे़  या प्रकरणी महिला रुग्णाच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले असून रुग्ण महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून पोलिसांनी डॉ. शिंदे यांना अटक केली आहे. दरम्यान, सदर डॉक्टरच्या ओझर येथील हॉस्पिटलचीही चौकशी करण्याची मागणी डेकाटे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)