शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:05 IST

सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन न करता शहरालगत भाक्षी (ता. बागलाण) शिवार हद्दीतील एका लॉन्समध्ये बुधवारी विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यात नियम धाब्यावर बसवून प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने तत्काळ कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे सटाणा : नियमांचे उल्लंघन प्रकरणी तीन कार्यालय सील

सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन न करता शहरालगत भाक्षी (ता. बागलाण) शिवार हद्दीतील एका लॉन्समध्ये बुधवारी विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यात नियम धाब्यावर बसवून प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने तत्काळ कारवाई करण्यात आली.या लॉन्स मालकावर गुन्हा दाखल केला तसेच भाक्षी रस्त्यावरील इतर तीन मंगल कार्यालये प्रशासनाने पुढील आदेश होईपर्यंत सील केले आहेत.बुधवारी (दि.३१) सटाणा - भाक्षी रस्त्यावरील भाक्षी शिवारातील जल मल्हार लॉन्स या मंगल कार्यालयात बंदी असतानाही वर्‍हाडींच्या मोठ्या संख्येमध्ये विवाह सोहळा झाल्याची माहिती तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी संयुक्तरित्या घटनास्थळी पाहणी करून मंगल कार्यालय मालकांवर सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या विवाह सोहळ्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. मास्क व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन न करता विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असूनही खबरदारी घेतली नाही. हे कृत्य निष्काळजीपणे आणि धोकादायक असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कार्यालय मालकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शहरातील जयमल्हार, गुरुप्रसाद, आणि संतोष मंगल कार्यालय ही कार्यालये कोविड नियमांचे पालन करीत नसल्याची बाब निदर्शनास आल्याने तीनही मंगल कार्यालये तहसिलदार श्री.इंगळे-पाटील यांच्या पथकाने सील केली आहेत. नियमांचे पालन न करणारी शहरातील काही दुकानेही प्रशासनाच्या रडारवर असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPolice Stationपोलीस ठाणे