शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लभंगार बाजारावर आता बंदोबस्तानंतर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:41 IST

अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा बाजार वसू लागला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच भंगार बाजार हटविण्याची कारवाई शक्य असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले.

नाशिक : अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा बाजार वसू लागला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच भंगार बाजार हटविण्याची कारवाई शक्य असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने, त्याबाबत कायदेशीर मत मागविण्यात आले आहे.महापालिकेने बहुचर्चित भंगार बाजार हटविण्याची ऐतिहासिक कामगिरी जानेवारी २०१७ मध्ये केली होती. मात्र, पुन्हा भंगार बाजार वसणार नाही, याकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. भंगार बाजार वसत असताना त्यावर तातडीने कारवाई झाली असती तर पुन्हा एकदा भंगार बाजार पसरला नसता. दरम्यान, भंगार बाजार व्यावसायिकांनी महापालिकेच्या कारवाईविरुद्ध पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तर मनपा प्रशासनाने भंगार बाजारावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाला पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केलेली आहे. परंतु, सण-उत्सवाची कारणे देत पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे भंगार बाजारावरील कारवाई रखडली आहे.