शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

तक्रारी प्रलंबित राहिल्यास विभागप्रमुखांवर कारवाई

By admin | Updated: April 7, 2016 00:05 IST

महापालिका : आयुक्तांनी मागविला अहवाल

 नाशिक : महापालिकेने गतवर्षी १५ सप्टेंबरला स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व सूचनांसाठी वाजत-गाजत ‘स्मार्ट नाशिक’ हे मोबाइल अ‍ॅप आणले; परंतु ३० दिवसांचा कालावधी उलटूनही तक्रारींचा निपटारा होत नसल्याने आयुक्तांनी विभागप्रमुखांनाच जबाबदार धरले असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.मनपाचा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष असून हेल्पलाइनसह मोबाइल अ‍ॅपवरही तक्रारींचा पाऊस पडत असतो. मात्र, तक्रारींचे निराकरण मुदतीत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतली. सर्व विभागप्रमुखांकडून त्यासंबंधीचा अहवाल मागविला आहे. महापालिकेकडे एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यास तीस दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण होणे आवश्यक आहे. परंतु ३० दिवस उलटूनही तक्रारी प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रलंबित तक्रारींचा निपटरा करण्याचे आणि ३० दिवसांच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे आदेश आयुक्तांनी विभागप्रमुखांना काढले आहेत. विभागप्रमुखांनी तक्रारींसंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.