शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यातील दोषींवर लवकरच कारवाई

By admin | Updated: June 24, 2017 00:57 IST

नाशिक : न्या. गायकवाड समितीच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेले माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्नाशिक : न्या. गायकवाड समितीच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेले माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी त्याबाबतचे संकेत शुक्रवारी (दि. २३) नाशिक दौऱ्यात दिले.आदिवासी विकास विभागात परिसर सेवा संस्थांकडून वसतिगृह व आश्रमशाळा सुधारणा व अंमलबजावणीसाठी बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी ते नाशिकला आले होते. या सेवा संस्थांनी सुचविलेल्या सूचना निश्चितच आदिवासी विकास विभागासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग नेहमीच खरेदी आणि निविदांच्या प्रकारामुळे चर्चेत येतो. त्याला फाटा देण्यासाठी यावर्षापासून विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या १७ वस्तूंचा थेट लाभ आदिवासी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी करीत या विद्यार्थ्यांच्या खात्यावर ६० टक्के रक्कमही वितरित करण्यात आल्याचे सावरा यांनी सांगितले. तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना घरभाडे व दोन वेळचा नाश्ता व जेवणाचे बिल देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. न्या. गायकवाड समितीने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवल्यावर काय कारवाई करणार? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, न्या. गायकवाड समितीने सीलबंद अहवाल सादर केला आहे. तो उघडण्यात आल्यानंतर त्यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे माजीमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यापुढील अडचणी वाढणार असून, यातील दोषी आढळलेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, नाना नवले, शिवराम झोले, एन.डी. गावित, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, लक्ष्मण भांगरे आदी उपस्थित होते.