शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:01 IST

कळवण : ग्रामीण भागात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, हेल्मेटचा वापरच होत नसल्याने हा आकडा दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी जिल्ह्याच्या सर्वच भागात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी आज कळवण पोलीस स्टेशनच्या मोहिमेत कोल्हापूर फाटा येथे सहभागी होऊन हेल्मेटचा वापर करणाºया मोटारसायकल चालकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

ठळक मुद्देहेल्मेटसक्ती : हेल्मेटधारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कळवण येथे हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वाराचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना डॉ. संजप दराडे. समवेत सुधाकर मांडवकर, भूषण देशमुख, मधुकर तारू, रायसिंग जाधव आदी.

कळवण : ग्रामीण भागात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, हेल्मेटचा वापरच होत नसल्याने हा आकडा दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी जिल्ह्याच्या सर्वच भागात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी आज कळवण पोलीस स्टेशनच्या मोहिमेत कोल्हापूर फाटा येथे सहभागी होऊन हेल्मेटचा वापर करणाºया मोटारसायकल चालकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.आज कळवण शहर व तालुक्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर व मोटार वाहन नियमांचे उल्लंघन विषयक कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत ७९ वाहनचालकांना २३,६०० रुपये दंड करण्यात आला आहे. कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत ४७ केसेस करून १४,८०० रुपये तर अभोणा पोलीस स्टेशन अंतर्गत ३२ केसेस करून ८,८०० रुपये दंड करण्यात आला.कळवण तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील दळणवळणाची सुविधा सध्या अवघड झाली असून, सर्वच भागात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. दरवर्षी वाहनांची संख्याही वाढते आहे.मोटारसायकल अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, हेल्मेटचा वापर होत नसल्याने हा दुचाकीस्वार बळींचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणाºया वाहनचालकांवर लक्ष केंद्रित केले असल्याने कळवण तालुक्यात कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिमेबाबत पोलिसांनी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीही करून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले असल्याने मोहीम प्रभावीपणे यशस्वी करण्यात येणार आहे. हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली असून, यासाठी गावागावांत जनजागृती बाबतचे फलक लावण्यात आले आहेत.१ फेब्रुवारीपासूनहेल्मेट वापरण्यासंदर्भात जिल्ह्यात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.हेल्मेट न घातल्यामुळे होणाºया दुर्घटना, अपंगत्व व त्यावरील उपचारांसाठी लागणारा लाखो रु पयांचा खर्च लक्षात घेता प्रत्येक दुचाकीस्वाराने व मागे बसणाºया व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे.याकडे दुर्लक्ष करणाºयांवर पोलीस कारवाई करतील.- डॉ. संजय दराडे,जिल्हा पोलीस अधीक्षक