शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत कारवाई शक्य

By admin | Updated: May 16, 2017 23:35 IST

आदिवासी आयुक्तांचे सूतोवाच : आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आदिवासी विकास विभागा-मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांतर्गत झालेल्या घोटाळ्याबाबत दोषींवर कारवाई करण्याचे सूतोवाच आदिवासी विकास आयुक्त आर.बी. कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना केले.आदिवासी विकास विभागामार्फत ‘कन्यादान’ योजनेअंतर्गत ८०० विवाह झाल्याचा दावा प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला होता. नाशिक विभागातील कळवण, नाशिक, राजूर, तळोदा, नंदुरबार व यावल या सहा प्रकल्पांतर्गत तब्बल ३७ कोटी २५ लाख २३ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे निवृत्त न्या. एम. जी. गायकवाड यांच्या समितीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. ‘कन्यादान’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्याशिवाय यावल येथे दुभती जनावरे खरेदी-वाटप प्रकरणात दोन कोटी ४३ लाख ५३ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे न्या. एम. जी. गायकवाड समितीच्या अहवालात नमूद आहे. तसेच त्याची चौकशीची शिफारस समितीने केली आहे. कळवण प्रकल्प अधिकाऱ्यांनीही दुभती जनावरे वाटपाबाबत खोटी कागदपत्रे बनवून १४ कोटी ५७ लाख १६ हजार रुपये लाटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये २००४ ते २००९ कार्यकाळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित मक्तेदारांशी संगनमत करून निविदाप्रक्रियेला बगल दिल्याचा ठपका अहवालात नमूद आहे. नुकतेच मे महिन्याच्या सुरुवातीला नाशिकला आदिवासी विकास आयुक्तपदी बदली झालेले आर. बी. कुलकर्णी यांनी या सर्व प्रकरणांबाबत राज्य स्तरावरून अद्याप स्पष्ट सूचना अथवा आदेश आलेले नाहीत. मात्र या सर्व प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाई शक्य आहे. लवकरच याबाबत सूचना प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त आर. बी. कुलकर्णी यांनी सांगितले. या सर्व घोटाळ्याबाबत आदिवासी विकास आयुक्तालयात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवत काहीही सांगण्यास नकार दिल्याचे चित्र होते.ठेकेदार पुणे-नाशिकचे?आदिवासी विकास विभागामार्फत पुरविण्यात येणारी अनेक कंत्राटे ही पुणे व नाशिक येथील संबंधित मक्तेदारांनाच वारंवार दिली गेल्याची चर्चा आहे. या मक्तेदारांचे आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्यानेच त्यांनाच वारंवार ही साहित्य पुरवठ्याची कंत्राटे मिळत असल्याची दबक्या आवाजात आदिवासी विकास आयुक्तालयाच्या आवारात चर्चा आहे.